बाहेर पडाल तर भर उन्हात काढा उठाबशा व मारा जोरबैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:38 IST2020-05-02T18:38:28+5:302020-05-02T18:38:59+5:30

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे प्रशासनाने कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे त्यातच शनिवारी सकाळी 5.30 ते 8 या वेळेत आष्टी शहीद येथे विनाकारण दुचाकीवर फिरणारे, मास्क न वापरता फिरणारे अशा व्यक्तींवर तहसीलदार यांचे पथकाने दंडात्मक कारवाई केली.

If you go out, stand up under hot sun | बाहेर पडाल तर भर उन्हात काढा उठाबशा व मारा जोरबैठका

बाहेर पडाल तर भर उन्हात काढा उठाबशा व मारा जोरबैठका

ठळक मुद्देबाहेर पडू नका असे सांगूनही सकाळी फिरायला जाणाऱ्या २४५ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे प्रशासनाने कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे त्यातच शनिवारी सकाळी 5.30 ते 8 या वेळेत आष्टी शहीद येथे विनाकारण दुचाकीवर फिरणारे, मास्क न वापरता फिरणारे अशा व्यक्तींवर तहसीलदार यांचे पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांना उठाबशा काढणे,जोर काढणे अशा शिक्षा करून त्यांच्याकडून चांगलाच व्यायाम करून घेतला आहे. 245 व्यक्तींकडून 58 हजार 500 रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. सदर रक्कम शासन जमा करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी व कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

Web Title: If you go out, stand up under hot sun