डेंग्यूविरूद्धच्या युद्धात शेकडो विद्यार्थी मैदानात

By Admin | Updated: September 11, 2014 23:45 IST2014-09-11T23:45:40+5:302014-09-11T23:45:40+5:30

शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे़ याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागरण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Hundreds of students in the battle against Dengue | डेंग्यूविरूद्धच्या युद्धात शेकडो विद्यार्थी मैदानात

डेंग्यूविरूद्धच्या युद्धात शेकडो विद्यार्थी मैदानात

पुलगाव : शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे़ याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागरण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी, नगर परिषद कर्मचारी, शिक्षक, नगरसेवक व शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गत काही दिवसांपासून शहरात संततधार पावसामुळे व परिषदेच्या गलथान कारभारामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरातील अनेक भागात डेंग्यूने थैमान घातले. यात तीन बालकांचा नाहक बळी गेल्याने शासनाची झोप उडाली़ अनेक डेंग्यू सदृश्य रुग्ण उपचार घेत आहेत. अशातच उशीरा का होईना, न.प. वैद्यकीय व शहरातील शैक्षणिक शाळांनी सहभाग घेतला. यात ललिताबाई मुरारका हायस्कूल, ज्ञानभारती विद्यालय, आर.के. हायस्कूल, आदर्श हायस्कूल, डॉ. चंद्रशेखर आझाद उर्दू हायस्कूल, नगर परिषद हायस्कूल, इंडियन मिलिटरी स्कूल, औद्योगिक प्रशिक्षक संस्था यासह अनेक शाळांनी या मोहिमेत सहभाग घेतला. घरोघरी जाऊन सांडपाणी, केरकचरा व डेंग्यू सदृश्य परिस्थितीत आढळल्यास सावधगिरीचे मार्गदर्शन करण्यात आले़ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारळवार यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी टेमिफॉस नावाचे द्रावण टाकून डेंग्यू सदृश्य जंतूचा नाश केला. त्याचप्रमाणे चुडी मोहल्ला येथे लॉयन्स क्लबच्यावतीने नाल्यांमध्ये विषारी औषधाची फवारणी करण्यात आली़ नगरसेवक अरुण रामटेके यांनी ५००० पत्रके छापून शहरात वाटून योगदान दिले.
या मोहिमेत नगराध्यक्ष मनीष साहू, मुख्याधिकारी राजेश भगत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार, राजन चौधरी, प्रा. रविकिरण भोजने, विठ्ठल वानखेडे, प्रा. डोंगरे, शंभरकर, लाखे, हटवार, रायपूरे, गायगोले, येंडे, सूर्यवंशी, पाकमोडे, जमील, लॉयन्स क्लबचे डॅनियल, कैलाश शर्मा, अझहर अहमद खान, अलझद मोहोनुद्दीन, शिदोडकर, मुन्ना पंड्या, डॉ. चव्हाण, नगरसेवक, २५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत मोहीम राबविली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of students in the battle against Dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.