शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीतील शंभरावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीन दिवस चालेल्या या नियोजनपूर्व बदली प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधरे विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

ठळक मुद्देतीन दिवस राबविली प्रकिया : ११ विभागातील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक बदल्यांची प्रक्रिया कोरानायनामुळे मे ऐवजी जुलै महिन्यात राबविण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या ऑफलाईन बदली प्रक्रियेमध्ये अकरा विभागातील तब्बल १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या.जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीन दिवस चालेल्या या नियोजनपूर्व बदली प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधरे विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहायक (लिपिक), परिचर, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पट्टींबधक, विस्तार अधिकारी (कृषी), कृषी अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, औषधनिर्माण अधिकारी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बालकल्याण सभापती सरस्वती मडावी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे, समाजकल्याण सभापती विजय आगलावे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत तीन दिवस ही बदली प्रक्रिया पार पडली. गुरुवारपासून सुरु झालेली ही प्रक्रिया रविवारपर्यंत चालली. शनिवारी सुटी आल्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशीही बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान कोरोना काळातील उपाययोजनांचे पालनही करण्यात आले.समानिकरण बदल्याबाबत व्यक्त होताहेत नाराजीजिल्हा परिषदेतील ११ विभागातील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती, आपसी व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. यामध्ये १८ कर्मचाºयांच्या प्रशासकीय, १९ कर्मचाºयांच्या विनंती, १४ कर्मचाऱ्यांच्या आपसी तर ५० कर्मचाºयांच्या समानिकरण पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहे. सर्वाधिक बदल्या समानिकरण पद्धतीने करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांसह काही जिल्हा परिषद सदस्यांकडूनही याबाबत आक्षेप घेतला जात आहे. हा तोंडी आक्षेप लवकरच लेखी स्वरुपातही सभागृहात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद