ठाणेदार जोपासताहेत गावठी श्वानांचा गोतावळा

By Admin | Updated: September 11, 2014 23:45 IST2014-09-11T23:45:00+5:302014-09-11T23:45:00+5:30

माणसापेक्षा कुत्रा ईमानदार असतो, असे म्हणतात. वेळप्रसंगी स्वत:चे प्राण देवून त्याने याची प्रचिती दिली असल्याच्या अनेक घटना अनुभवात आल्या आहेत. असाच काही अनुभव येथील पोलीस निरीक्षक धनंजय सायरे

The hinges of the livestock are growing by the thieves | ठाणेदार जोपासताहेत गावठी श्वानांचा गोतावळा

ठाणेदार जोपासताहेत गावठी श्वानांचा गोतावळा

हरिदास ढोक - देवळी
माणसापेक्षा कुत्रा ईमानदार असतो, असे म्हणतात. वेळप्रसंगी स्वत:चे प्राण देवून त्याने याची प्रचिती दिली असल्याच्या अनेक घटना अनुभवात आल्या आहेत. असाच काही अनुभव येथील पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना आल्यामुळे त्यांनी या प्राण्यांचा लळा जोपासला आहे. कुत्रा म्हणून त्याला टाळण्यापेक्षा त्याच्याशी जवळीकता साधून देवळी पोलीस ठाण्यात दूध बिस्कीट भरविले जात आहेत.
शहरातील वाढत्या प्रदुषणामुळे गावठी कुत्र्यांना खरूज सापेक्ष चमडीचा आजार जडल्यामुळे त्यांना दुधामधून औषधी देवून आरोग्य जोपासले जात आहे. त्यामुळे पोलीस ठाणे व आवारात सायरे यांच्या आजूबाजूला दिसणारी गावठी कुत्री लोकांसाठी कुतुहलाचा विषय बनला आहे. एरव्ही स्वभावातील कठोरपणाचा परिचय देणाऱ्या पोलिसांकडून आपुलकीची अपेक्षाच नसताना गावठी कुत्री मात्र याला अपवाद कशी, याचे उत्तर शोधत असताना नेहमीच दुर्लक्षीत ठरलेला कुत्रा, हाच शौयपुरस्काराचा मानकरी होता. हेच सत्य सायरे यांच्या वक्तव्यातून अनुभवता आले.
त्यामुळेच माणसापेक्षा जीवापार पे्रम करणारा सवंगडी म्हणून ते या प्राण्यांकडे पाहतात. एका भाकरीच्या मोबदल्यात आपल्या प्राणांची आहुती देणारा हाच खरा सरकारी कर्मचारी आहे, असाच त्यांचा अनुभव राहिला आहे.

Web Title: The hinges of the livestock are growing by the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.