वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे पोलिसांवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 12:37 IST2021-08-13T12:36:24+5:302021-08-13T12:37:05+5:30

 वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येनोरा येथे नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी बुधवारी रात्री पोलिस जमादार धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने या गोळीबारात ते थोडक्यात बचावले.

Hinganghat police fired at Yenora |  वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे पोलिसांवर गोळीबार

 वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे पोलिसांवर गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क

 वर्धा  - येथील नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी बुधवारी रात्री पोलिस जमादार धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने या गोळीबारात ते थोडक्यात बचावले.

त्यानंतर पोलिसांद्वारे या गुंडांची शोध मोहीम सुरू असताना गुरुवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास हिंगणघाट पासून चार किलोमीटर अंतरावरील येनोरा या गावात दोन अज्ञात तरुण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस ,या गुंडांच्या  शोधार्थ येणोरा गावात आले. पोलिस दिसतात या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नेम चुकल्याने यात कोणीही जखमी झालेले नाही. गुंडांनी दुचाकी तेथेच सोडून रस्त्याकडेला शेत शिवारातून पळ काढला. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पळाले. आरोपींना ताब्यात घेण्यात साठी शोध मोहीम राबविली जात आहे

Web Title: Hinganghat police fired at Yenora