शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट जळीतकांड; विकेशला अखेर मरेपर्यंत जन्मठेप, पाच हजार रुपयांचा दंड, न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 06:36 IST

नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे कळताच जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या भावनांना घोषणेच्या रूपाने वाट मोकळी करून देत मृत अंकिताला श्रद्धांजली वाहिली.

नरेश डोंगरे -

हिंगणघाट (जि. वर्धा) : प्रा. अंकिता पिसुड्डेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवणारा क्रूरकर्मा विकी उर्फ विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे कळताच जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या भावनांना घोषणेच्या रूपाने वाट मोकळी करून देत मृत अंकिताला श्रद्धांजली वाहिली. नगराळेने ३ फेब्रुवारी २०२० ला अंकितावर पेट्रोल टाकून तिला पेटवले होते. १० फेब्रुवारीला अंकिताचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून  तपास केला. हिंगणघाट न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. 

सायंकाळी ५ वाजता निकालगुरुवारी दुपारी ११ वाजता कडक बंदोबस्तात आरोपी विकेश याला न्यायालयात आणण्यात आले. त्याचवेळी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम पोहोचले. ११.१५ वाजता न्या. राहुल भागवत न्यायासनावर स्थानापन्न झाल्यानंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले. ॲड. निकम यांनी ३६ मिनिटांचा युक्तिवाद करताना विविध प्रकरणांचे अनेक दाखले देत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तर बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने यांनी आरोपीला कमीतकमी शिक्षा व्हावी, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सायंकाळी ५ वाजता आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ॲड. निकम यांनी मांडलेले मुद्दे -- हे क्रौर्य दुर्मीळ. म्हणून त्याला मृत्युदंड द्या.- ‘तू मेरी नही तो किसी की नही’, ही वृत्ती खतरनाक.

बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे  -- पोलिसांनी तीन एफआयआर केले आहेत.- किती टक्के जळाली यावरून डॉक्टरांच्या अहवालात विसंगती आहे. - २९ पैकी कोणत्याही साक्षीदाराची साक्ष सुसंगत नाही. - अनेक साक्षीदार घटनास्थळी हजरच नव्हते.

आरोपी म्हणाला...माझे आई-वडील म्हातारे आहेत. ते माझ्यावर अवलंबून आहेत. मला पत्नी आणि छोटी मुलगी आहे. मला अटक करण्यात आली त्यावेळी ती केवळ सात दिवसांची होती. हे लक्षात घेऊन मला न्यायालयाने दया दाखवावी, असे आरोपी विकेश नगराळे न्यायालयात म्हणाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिसCourtन्यायालय