शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरच्या घिरट्या, शिंदे म्हणाले प्रयत्न कर, पायलट म्हणाला ‘महागात’ पडेल

By रवींद्र चांदेकर | Updated: July 22, 2025 20:27 IST

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा : शेवटी 'समृद्धी'ने आले वर्ध्यात

वर्धा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दुपारी ०२:३० वाजेच्या सुमारास वर्धेत येत असताना मुसळधार पावसामुळे त्यांचे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होते. पायलटने हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी दृश्यता कमी असल्याचे सांगताच शिंदे यांनी त्यांना प्रयत्न करण्यास सांगितले. मात्र, पायलटने प्रयत्न ‘महागात’ पडेल, असे सांगताच, अखेर हेलिकॉप्टर माघारी नागपूरला नेण्यात आले. अखेर शिंदे समृद्धी महामार्गाने येथे दाखल झाले.

सेवाग्राम येथील चरखा भवनात मंगळवारी ‘निरामय वर्धा’ अभियानांतर्गत मोतीबिंदूमुक्त वर्धा जिल्हा अभियानाचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा किस्सा सांगितला. कार्यक्रमाला मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, आमदार नरेंद्र भोंडेकर, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, किरण पांडव, मंगेश चिवटे आदींची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी वर्धेत एकदा नव्हे, तर आताच दोनदा आलो. पायलटने प्रयत्न महागात पडेल, असे सांगताच, हेलिकॉप्टर माघारी फिरविले. मात्र, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा आग्रह आणि सर्व जनतेच्या प्रेमामुळे मी अखेर समृद्धी महामार्गाने येथे आलो आहे. येथे येण्यात अनेक अडथळे आले. मात्र, तुमच्या प्रेमाने मला खेचून आणले. मी वादळ, वाऱ्याची पर्वा करीत नाही. मला लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, बळीराजाला भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे सर्व संकटांवर मात करून येथे आल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

दुसऱ्या ‘इनिंग’मध्येही राज्य आघाडीवरआम्ही टीकेला कामातून उत्तर देतो. महाविकास आघाडीने अनेक योजना बंद केल्या होत्या, त्या आमच्या सरकारने पुन्हा सुरू केल्या. आमच्या सरकारची दुसरी इनिंग सुरू झाली. या इनिंगमध्येही राज्य सकल राष्ट्रीय उत्पन्न, परकीय गुंतवणूक, आरोग्य या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या योजनांना पाठबळ देतात, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आत्महत्याग्रस्त विदर्भाला दिलासाजिल्ह्यात पूर्वी दोन वैद्यकीय महाविद्यालये होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिसरे वैद्यकीय महाविद्यालय प्राप्त झाले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा- नळगंगा प्रकल्पाची घोषणा केली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळून दिलासा मिळेल, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेwardha-acवर्धा