शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

पुलगावकरांना स्वर्गीय सुरांचा नजराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:48 PM

चैत्रपालवीतून वाहणारा प्रभात समयीचा मंदवारा, फुलांची उधळण, असंख्य संगीत रसिकांची भरगच्च उपस्थिती आणि सूर्यकिरणांची सोनेरी पहाट.

ठळक मुद्दे‘सारेगामा’ कलावंतांच्या सप्तसुरांनी मंतरली ‘पाडवा पहाट’

ऑनलाईन लोकमतपुलगाव : चैत्रपालवीतून वाहणारा प्रभात समयीचा मंदवारा, फुलांची उधळण, असंख्य संगीत रसिकांची भरगच्च उपस्थिती आणि सूर्यकिरणांची सोनेरी पहाट. अशा मंगलदायी वातावरणात सारेगामा संगीतमाळेचे कंठमणी ठरलेले चैतन्य कुळकर्णी, सायली सांभरे, किशोर अगडे या सूरभास्करांनी चैत्र पहाटेला एकाहून एक सरस मराठमोळी भक्तीगीत अभंग, गझल, लावणी, गौळण अशा गीतांचा नजराणा सादर करून पुलगावकरांच्या हृदयाची तार छेडली.स्थानिक दिनदयाल चौकात संस्कारभारती पुलगाव आणि विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गुढीपाडवा उत्सवाचे निमित्ताने सारेगामा फेम गायक व दुरदर्शन मालिकेची अभिनेत्री व गायिका सायली सांभारे या गायवकांच्या पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष शितल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी तसेच आयोजक पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रामाला प्रारंभ झाला. या स्वरांच्या मैफलीचा प्रारंभ सूर निरागस हो गणपती या चैतन्य कुळकर्णीच्या गणेश वंदनाने झाला तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल हे भक्तीतगत सायली सांभारे या गायिकेने सादर करून चैत्रपहाट भक्तीमय केली रांगोळ्यांनी सडे सजवित उष:काल जाहला ही भूपाळी गायक किशोर अगडे यांनी सादर करून प्रभात समयीच्या मंगल वातावरणाची निर्मिती केली तर निघाले घेवून दत्ताची पालखी व अबीर गुलाल उधळीत रंग हा नाथीचा अभंग चैतन्य कुळकर्णी यांनी सादर करून आपली गायकनावरची पकड सिद्ध केली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली ही सुरेश भटांची गझल सायली सांभारेच्या सुरेल स्वरातून सादर झाल्यावर उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर तिनेच रेशमांच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी ही लावणी सादर करून श्रोत्यांना अस्सल मराठमोळ्या प्रांतात नेवून सोडले. हरीने गवळींना ठगविले ही मराठी कोणी कन्नड, गुजराती, तामीळ, अशा बहुरंगी भाषेची मिश्रसंगीताची राग दरबातिची गवळठा किशोर अगडे या उमद्या गायकाने गावून रसिकांची प्रभात मंतरून टाकली.एकाहून एक सरस भावगीत, अभंग, गझल, लावणी तसेच बंदीरा सुरेश आवाजात संगीताच्या साथीसह सादर करून पाडवा पहाट उजळून टाकली. सजल नयनीत धार बरसती या गिताच्या स्वरतुषांरांनी स्वरमैफलीची सांगता झाली. यावेळी संस्कार भारतीचे बबन बरबड, सुबोध चाचणे, विवेकानंद पंतसंस्थेचे डॉ. प्रकाश हनवंते, सुरेश गणेशपूरे, शैलजा सुदामे, अनील पांडे, नितीन बडगे, यांच्सासह संघतालुकाप्रमुख विजय निवल, उपाध्यक्ष आशिष गांधी, केशराव दांडेकर, किशोर गव्हाळकर व रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी नगर परिषद व भाजपा शाखेने नागरिकांना गुढीपाडव्या निमित्त साखरपानाचे वितरण केले.