शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे पाणी वाहते नाल्यांत

By admin | Updated: January 25, 2015 23:19 IST

शहराला पाणीपुरवठा करणारी योजना सदोष असल्याने निम्मे पाणी वाया जात आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाही सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरातील नाल्यांतून वाहत आहे.

वर्धा : शहराला पाणीपुरवठा करणारी योजना सदोष असल्याने निम्मे पाणी वाया जात आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाही सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरातील नाल्यांतून वाहत आहे. याचा फटका पालिकेला बसत असल्याने पाणीपुरवठा योजना पालिकेकरिता नुकसानीची ठरत आहे.वर्धेला पाणी पुरवठा करण्याकरिता पवनार व येळाकेळी येथून पाणी घेतल्या जाते. येळाकेळी येथे १७ तर पवनार येथून १२ एमएलडी (मिलियन लिटर पर डे) पाणी पुरविण्याची ताकद आहे. शहराला दिवसाआड १६ एमएलडी पाण्याची गरज भासते. तेवढे पाणी या दोनही केंद्रातून घेतले जात असून यातील निम्मे पाणी वाया जात आहे. याला केवळ पालिकेची सदोष पाणीपुरवठा योजना कारण असल्याचे समोर आले आहे.शहरात पालिकेच्या एकूण १४ हजार नळ जोडण्या असल्याची नोंद आहे. ३७० सार्वजनिक नळ आहेत. या नळांना पाणी पुरविण्याकरिता असलेली नळ योजना कुचकामी ठरत आहे. पाणी मुबलक असताना केवळ नळाला दाब येत नसल्याने वेळेपेक्षा अधिक काळ नळ सुरू असतात. यामुळे पाण्याचा अपव्य होत आहे. एकाच लाईनमध्ये असलेले नळ सुमारे तीन ते चार तास सुरू ठेवावे लागतात. एका घरी पाणी भरण्याकरिता साधारणत: अर्धा तासाचा कालावधी पुरेसा आहे; मात्र या अर्ध्या तासाकरिता नळ तीन ते चार तास सुरू राहत असल्याने पाण्याचा अपव्यय आहे. पालिकेच्यावतीने एका अर्धा इंची नळाकरिता वर्षाकाठी सरासरी १ हजार ५०० रुपयांचे देयक आकारण्यात येत आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे पालिकेला अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.(प्रतिनिधी)