विद्यार्थ्यांना मेळाव्यातून तंत्रशिक्षणावर मार्गदर्शन
By Admin | Updated: June 20, 2017 01:06 IST2017-06-20T01:06:41+5:302017-06-20T01:06:41+5:30
इयत्ता दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना मेळाव्यातून तंत्रशिक्षणावर मार्गदर्शन
तंत्रशिक्षण मंडळाचा उपक्रम : रोजगाराच्या संधीबाबत केले अवगत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इयत्ता दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहे. मात्र तंत्रशिक्षण विषयाची माहिती विद्यार्थी व पालकांना कमी प्रमाणात असल्याने काय निर्णय घ्यावा याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अभ्यासक्रमाची निवड सोपी व्हावी यादृष्टीने महाराष्ट राज्य तंत्रशिक्षण मंडळ व श्री व्यंकटेश पॉलीटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी स.म. डूरे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. प्रशांत जाचक होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. डी.बी. पुनसे, प्रा. एच. एस. चेपे, हरिष हांडे, प्रा. डॉ. श्रीकांत जाचक, प्रा. वर्षा जाचक, प्रा. संदेश राऊत, प्रा. प्रशांत मुजबैले, गणेश पटले यांची उपस्थिती होती. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा जाचक यांनी केले. मार्गदर्शन करताना डॉ. पुनसे म्हणाले की, तंत्रविज्ञानाशिवाय आपण जगूच शकत नाही. त्याकरिता तंत्रविज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपले जीवन उज्ज्वल होईल. तर प्रा. एच.एस. चेपे म्हणाले की, केवळ पोपटपंची नको तर प्रत्याक्षिकावर भर द्यावा. आपण डिप्लोमा व डिग्री मिळविल्यानंतर त्याचा भाविष्यात उपयोग करणे हे देखील आवश्यक आहे. यानंतर त्यांनी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. हरिष हांडे म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर व्यावसायिक शिक्षण गरजेचे आहे. कारण त्यातून आपण स्वयंरोजगार निर्माण करू शकतो. याबद्दल सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले. यानंतर बोलतांना प्रा. प्रशांत जाचक यांनी जि-स्किमच्या तुलनेत आय-स्किम या अभ्यासक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. हा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर आधारित असून उद्योगाशी निगडीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन कांचन युवंगावकर यांनी तर आभार प्रा. भिवगडे यांनी मानले. कार्यक्रमाला दहावी, बारावी, आय.टी.आय. चे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. तायडे, प्रा. गावंडे, प्रा. नक्षने, प्रा. परटक्के, योगेश इंगळे आदींनी सहकार्य केले.