शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

शाश्वत शेतीशाळेत गोमूत्र व्यवस्थापनावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:35 PM

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महिला विकास सशक्तीकरण परियोजनेंतर्गत विजय येंगडे, बालू महाजन यांच्या शेतात शाश्वत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देजीवनोन्नती अभियान : महिला विकास सशक्तीकरण परियोजनेंतर्गत उपक्रम

आॅनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महिला विकास सशक्तीकरण परियोजनेंतर्गत विजय येंगडे, बालू महाजन यांच्या शेतात शाश्वत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. यात शेतकऱ्यांना शाश्वत शेतीबाबत माहिती देण्यात आली. शिवाय गोमूत्र व्यवस्थापन याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.शेतकरी येंगडे यांनी शाश्वत शेतीची गरज विषद केली. जमिनीची क्षमता वाढावी व रासायनिक खताचा वापर कमी व्हावा म्हणून शाश्वत शेती गरजेची असल्याचे सांगितले. यासाठी वर्धा तालुक्यातील तळेगाव (टा.) येथील प्रगतशील शेतकरी येंगडे, महाजन यांच्या शेतात शेतीशाळा प्रात्यक्षिक उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला शेतकरी कुंदनलाल जयस्वाल, चौधरी, जिल्हा व्यवस्थापक ज्ञान व्यवस्थापन मनीष कावडे, तालुका अभियान व्यवस्थापक रजनी श्रीरभय्ये, राजू वानखेडे, प्रभाग समन्वयक आनंद फेतफुलवार, समुदाय कृषी व्यवस्थापक अतुल शेंद्रे, सुरज घायवट, कृषी सखी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमा पाटील, सोनी बालपांडे आदी उपस्थित होते.येंगडे, महानज यांच्या शेतातील शाश्वत शेतीत वापरात असलेल्या पद्धतीची माहिती करून घेण्यात आली. त्यांच्या शेतात असणाºया गांडूळ खत प्रकल्प, कोंबडी पालन, मच्छी पालन, डेमो प्लॉटची पाहणी करण्यात आली. गाईच्या गोमूत्र व्यवस्थापन आदीबाबत माहिती करून घेण्यात आली. प्रशिक्षक राजू वानखेडे यांनी शेती शाळेदरम्यान शाश्वत शेती उपक्रमांतर्गत सेंद्रीय शेती व खतावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.शेण, माती, गुळ, मिश्र पीक पद्धत, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, ड्रीपलोकिंग पद्धत, सरीवरंभा पद्धत, दशपर्णी, निमआॅईल, गौरी अर्क, बीज प्रक्रिया व फुलशेतीवर प्रात्यक्षिक आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सेंदीय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून उमेद अभियानाद्वारे कृषी उपजीविकेमध्ये गटात समाविष्ट प्रत्येक महिलांच्या शेतात किमान एक एकरमध्ये शाश्वत शेती व प्रत्येक महिलांच्या घरी परसबाग तयार करण्याचे उद्दीष्ट अभियानात ठेवण्यात आले. शेती शाळेला वायफड, सेवाग्राम, तळेगाव प्रभागातील ३० कृषीसखी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतीशाळेला ग्रामसेवक संघ, कृषीसखी सोनी बालपांडे, शेतकºयांनी सहकार्य केले.नैसर्गिक तथा सेंद्रीय शेती करणे गरजेचेरसायणांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. मोठ्या प्रमाणात रसायणांचा वापर केला जात असल्याने रसायणयुक्त शेतमाल नागरिकांना आहारात घ्यावा लागत आहे. ही शेती टिकविण्याकरिता शाश्वत तथा नैसर्गिक शेती करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीशाळेत प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.