सोयाबीनला ५ तर कापसाला ७ हजार रुपये हमीभाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:17+5:30
सोयाबीनचे पीक शेतातच राहिल्याने उत्पादनही घटले आणि सोयाबीनचा दाणा काळा आल्याने भावही कमी मिळाला. कपाशीचीही वाढ झाली पण; बोंडाची संख्या नगण्यच आहे. आता कपाशीवर लाल्या रोग आल्याने पात्या व बोंड गळती सुरु झाली आहे.

सोयाबीनला ५ तर कापसाला ७ हजार रुपये हमीभाव द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : सततची नापिकी आणि परतीच्या पावसामुळे देशाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. सोयाबीनची तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने हिसकावून नेले. तसेच कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीनला पाच हजार तर कापसाला सात हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी मनसेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सोयाबीनचे पीक शेतातच राहिल्याने उत्पादनही घटले आणि सोयाबीनचा दाणा काळा आल्याने भावही कमी मिळाला. कपाशीचीही वाढ झाली पण; बोंडाची संख्या नगण्यच आहे. आता कपाशीवर लाल्या रोग आल्याने पात्या व बोंड गळती सुरु झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मुलांचे शिक्षण, आरोग्य व उदरनिर्वाह कसा चालवावा असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या या परिस्थितीचा विचार करुन सोयाबीनला ५ हजार तर कापसाला ७ हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे. या मागणीचे उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी व राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदन देतानामनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश घांघरे, बच्चू कलोडे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, तालुकाध्यक्ष सुधाकर वाढई, शहराध्यक्ष राजू सिन्हा, शेतकरी सेनेचे लक्ष्मण सावरकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे, समाजसेवक उमेश नेवारे, दौलतकर, नितीन भुते, नरेश चीरकुटे, गजू महाकलकर,राजू मुडे, मिथुन चौहान यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.