शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:46 IST

तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोटी रुपयांची सर्वाधिक कामे मागील चार वर्षांत करण्यात आली. असे असताना तालुका तहानलेला भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारअंतर्गत सर्वाधिक कामे : कोटी रुपयांवर निधी खर्च

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोटी रुपयांची सर्वाधिक कामे मागील चार वर्षांत करण्यात आली. असे असताना तालुका तहानलेला भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती पाहायला मिळत आहे.तालुक्यात २०१५-१६ या वर्षांत जलयुक्त शिवारअंतर्गत ५२ गावांमध्ये कामांना प्रारंभ झाला. या गावांमध्ये नाला खोलीकरण, ढाळीचे काम, धुऱ्यावर बंधारा, शेततळे, सिमेंट नालाबांध अशी ४५० कामे करण्यात आलीत.२०१६-१७ या वर्षांत १८ गावांत जलयुक्त शिवार योजनेची ११० कामे मंजूर होती. त्यापैकी १०६ कामे झाली. उर्वरित ४ कामांपैकी नागाझरी येथील नाला खोलीकरण रद्द करण्यात आले तर ३ कामे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आलीत. या वर्षात नाला खोलीकरणाची ८६ कामे, ढाळीचे काम १९ तर १ सिमेंट नाला बांधकाम करण्यात आले. २०१७-१८ या वर्षात १८ गावांत ६७ कामे करण्यात आलीत. यात ६ ढाळीचे बांध, ५४ नाला खोलीकरण व ७ जुने सिमेंट नाला बांध ही कामे करण्यात आली. या सर्व कामांवर १ कोटी २३ लाख ३ हजार ४७ रुपये खर्च करण्यात आला. २०१८-१९ या चालू वर्षात २१ गावांमध्ये एकूण ७३ कामे मंजूर असून यापैकी ६ कामे रद्द करण्यात आली आहेत. उर्वरित कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यावर्षीच्या कामात ६२ कामे नाला खोलीकरण ११ ढाळीचे बांध आहेत. रद्द झालेल्या ६ कामांपैकी ३ शेतकऱ्यांनी नकार दिला असून ३ ठिकाणी भूजल सर्वेक्षणाची कामे सुरू असल्यामुळे कृषी विभागाला ती कामे करता आली नाहीत. या वर्षीच्या कामावर एकूण खर्च १ कोटी २१ लाख ४४ हजार ६६८ मंजूर आहेत.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक कामे या तालुक्यात करण्यात आली. काही शेतकºयांनी कामाविषयी तक्रारीसुद्धा केल्या असल्याचे समजते. कारण फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होईल, अशी भिती शेतकऱ्यांना होती. कृषी विभागाद्वारे तक्रारीची चौकशी सुद्धा करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवालही सादर करण्यात आला.मागील चार वर्षांपासून ही कामे सुरू असून एकच गाव पुन्हा या योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले नाही. बऱ्याच ठिकाणी नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध ही कामे पाण्याच्या प्रवाहाने फुटली. काही ठिकाणी गाळदेखील साचलेला आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा जो चांगला उद्देश होता तोच मुळात साध्य झाला नाही. पावसाळ्यात काही दिवस पाणी असते, नंतर हे बांध कोरडे पडलेले असतात.जलयुक्तच्या कामांमुळे अनेक शेतकºयांना झाला फायदायाबाबत तालुका कृषी अधिकारी विजय महंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. याशिवाय मागील ३ वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेद्वारे ११४ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झालेत. या योजनेत १७ हजारांपासून ५० हजारापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात निधी मंजूर झाला. मागील वर्षी ७० टक्के पाऊस पडला. १४ सप्टेंबर २०१८ पासून पाऊस बंद झाला. तरीही आलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने मार्च, एप्रिलपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरींना व बोअरवेलला फायदा झाला.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार