शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बोलक्या भिंती शिल्पाच्या आवारात वाढले गवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती भावी पिढीला सहज समजावी या हेतूने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत मेडिकल चौकात जे. जे. स्कूल आॅफ आर्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भिंती शिल्प बसविण्यात आले आहे. या भिंती शिल्पामुळे मेडिकल चौकाचा चेहराही बदलला आहे. परंतु, सध्या या भिंती शिल्पाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदेखभालीकडे दुर्लक्ष : मेडिकल चौकातील प्रकार, योग्य कार्यवाहीची नागरिकांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत येथील मेडिकल चौकात कस्तुरबा गांधी यांच्या कार्य प्रसंगावर भिंतीशिल्प तयार करण्यात आले आहे; पण याच परिसरात सध्या काटेरी झुडपासह गवत वाढल्याने सुंदर सेवाग्रामच्या उद्देशालाच खो मिळत आहे.महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे सेवाग्रामला जगात ओळख मिळाली आहे. जगातील अनेक व्यक्तींनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे गांधी विचारांची माहिती जाणून घेतली आहे. शिवाय गांधी विचार कसे फायद्याचे आहे हे पटवून घेतले आहे. महात्मा गांधी यांना स्वातंत्र्य लढ्यात कस्तुरबा गांधी यांनीही मोठे सहकार्य केले. हे वारंवार महात्मा गांधी यांनी कबुलही केले आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती भावी पिढीला सहज समजावी या हेतूने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत मेडिकल चौकात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भिंती शिल्प बसविण्यात आले आहे. या भिंती शिल्पामुळे मेडिकल चौकाचा चेहराही बदलला आहे. परंतु, सध्या या भिंती शिल्पाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात झुडपांसह गवत वाढले असून वेळीय परिसर स्वच्छ करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणी नागरिकांची आहे.मुख्य उद्देशाला मिळतेय बगलस्वच्छ आणि सुंदर परिसर या उद्देशाने सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून अनेक विकास कामे सेवाग्राम परिसरात करण्यात आली. परंतु, सध्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने विकास कामाच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम