ग्रामपंचायतींचे व्यवहार ठप्प -आरोग्यसेवाही कोलमडली
By Admin | Updated: July 3, 2014 23:41 IST2014-07-03T23:41:54+5:302014-07-03T23:41:54+5:30
एकाच वेळी वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक संपावर गेल्याने प्रशासन कोलमडले आहे. मागण्या मान्य करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरु झाले आहेत. गुरुवारपर्यंत १२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी

ग्रामपंचायतींचे व्यवहार ठप्प -आरोग्यसेवाही कोलमडली
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे : डॉक्टर व ग्रामसेवक संपावर
वर्धा : एकाच वेळी वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक संपावर गेल्याने प्रशासन कोलमडले आहे. मागण्या मान्य करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरु झाले आहेत. गुरुवारपर्यंत १२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिल्याचे समजते. ग्रामसेवकांनी संप पुकारला असल्यामुळे ग्रामपंचायतींचे व्यवहारही ठप्प पडले आहे.
संप जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील १४ डॉक्टरांची निवड एमडी अभ्यासक्रमाकरिता झाल्याने त्यांनी राजीनामे दिले आहेत. संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. या संपामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अपुऱ्या मनुष्यबळावर केवळ बाह्य रुग्णसेवा कशीबशी सुरू आहे. तज्ज्ञाअभावी शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. महसूल विभागाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांनीही संपाचे हत्यार उगारले आहे. त्यांनी ग्रामपंचायतीच्या चाब्या गटविकास अधिकाऱ्यांना सोपविल्या आहेत. अशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संपामुळे सामान्यांच्या समस्येत भर पडली आहे.(प्रतिनिधी)