शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘नागपूर-वर्धा टुरिझम कॉरीडॉर’ला शासनाची हिरवी झेंडी

By admin | Updated: August 24, 2015 02:09 IST

विदर्भामध्ये पर्यटनाचे जाळे विकसित करण्याच्या दृष्टीने जनहित मंच ने महाराष्ट्र शासनापुढे वर्धा जिल्ह्यातील उत्तर पूर्वेचा भाग तर नागपूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम भाग ....

वर्धा : विदर्भामध्ये पर्यटनाचे जाळे विकसित करण्याच्या दृष्टीने जनहित मंच ने महाराष्ट्र शासनापुढे वर्धा जिल्ह्यातील उत्तर पूर्वेचा भाग तर नागपूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम भाग हा वनसंपदा वनसंपदा व जलसाठ्यांनी व्यापलेला भाग नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर हा महत्वाकांक्षी प्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला शासनाच्यावतीने हिरवी झेंडी देण्यात आल्याची माहिती जनहित मंचचे सचिव डॉ. राजेश आसमवार यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.हा भाग नैसर्गिक दृष्ट्या परिपूर्ण असून वर्धा नदीने वेढलेला व सातपुडा पर्वतरांगेतील वन संपदेने नटलेला आहे. महाकाली धरण, बोर धरण, मदन धरण, कान्होलीबारा धरण असे मोठे व छोटे जलसाठे, तसेच बोर अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पासह वन्य पशु पक्षी, झाडेझुडपे व वृक्षांनी घनदाट असलेला पर्यटन विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. यासाठी जनहित मंच वर्धाच्या नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर या प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. याची राज्य शासनाने विशेष दखल घेवून सकारात्मक पाऊल उचलले विदर्भासाठी तो लाभदायी ठरणार आहे. कवडस कान्होली बारा ते श्री क्षेत्र महाकाळीपर्यंत संपूर्ण भाग नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात यावा, यासाठी जनहित मंच वर्धाने स्थानिक आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याशी सदर प्रस्तावाबाबत चर्चा केली. आमदारांच्या सहकार्याने सदर प्रस्ताव २०१४ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांनी ६ फेब्रुवारी २०१५ ला संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत प्रस्तावाबाबत तात्काळ अहवाल मागवून घेतला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन धोरण आखतांना स्थानिक आमदारांनी या प्रस्तावाला शासन दरबारी उचलुन धरले व जनहित मंचच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला गती देण्यात आली.या प्रस्तावाबाबत सखोल माहिती घेण्यासाठी शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव अरूण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जनहित मंचचे डॉ. राजेश आसमवार, सतीश बावसे, सुभाष पाटणकर, प्रशांत कावरवे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार समीर मेघे, आमदार अनिल सोले तसेच सचिव, सिंचन विभाग, सचिव, वनविभाग, सचिव, पर्यटन विभाग, सचिव, आदिवासी विभाग. एम.टी.डी.सी.चे मुख्य संचालक व पदाधिकारी यांची मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला नागपूर कलेक्टर व वर्धा कलेक्टर यांना व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे जोडल्या गेले होते. या बैठकीत ज्या अडचणी समोर येत होत्या. त्या तात्काळ दूर करून हा प्रोजेक्ट त्वरीत मार्गी लावा अशा सूचना वजा आदेश अरूण परदेशी यांनी संबंधीत सचिवांना व अधिकाऱ्यांना दिले.शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलाने वर्धा व नागपूर येथील अधिकारी कामी लागले असून नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर प्रकल्पाला व्यापक गती मिळालेली आहे. विदर्भ विकासाच्या दृष्टीने जनहित मंचने तयार केलेला सदर प्रकल्प शासनाच्यावतीने साकार होण्याची चिन्हे असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांच्रूासह मंचाचे सुभाष पाटणकर, अनुपकुमार भुतडा, प्रमोद गिरडकर, प्रशांत वकारे, डॉ. अरविंद घोंगडे, आर्की, अलोक बेले, भास्कर पारखी, नंदु नरोटे, डॉ. सतीश हरणे, डॉ. जयंत मकरंदे, प्रशांत लांबट, डॉ. रमेश तन्नीरवार, हरिष जोतवाणी, प्रा. दिनेश चन्नावार, डॉ. दिनकर पुनसे, नरेश चांडक, सचिन धांदे, प्रशांत सोईतकर याच्यासह मंचाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)