भारतातच भारतीय चिकित्सेवर सरकारची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:08+5:30

कोरोनामुळे संपूर्ण जग जेरीस आले असताना जो-तो, उपचार सुचवित आहे. ते करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्लोरोईन, डेक्सामिथॉझोन इतकेच नव्हे तर काल-परवा सूचविलेली रेमडिसिव्हर ही महागडी उपचारपद्धती मान्य केली. प्रयोगांती यातील काही औषधी वापरण्यावर मनाई करण्यात आली. जगातील पंधराहून अधिक देशात कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरू आहे.

The government's crooked view on Indian medicine in India | भारतातच भारतीय चिकित्सेवर सरकारची वक्रदृष्टी

भारतातच भारतीय चिकित्सेवर सरकारची वक्रदृष्टी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील आयुर्वेद तज्ज्ञांमध्ये संताप : केंद्रसरकारच्या आयुष मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संपूर्ण जगाला कोरोना महामारीने ग्रासले असून जागतिक आरोग्य संघटनेपासून बहुतेक सर्व राष्ट्रांनी आपआपल्यापरीने उपचारपद्धती वापरून या रोगावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीसाठी उत्पादन करणाऱ्या पतंजलीने यावर औषध असल्याचा दावा करताच त्याला आयुष मंत्रालयाने थांबविले. त्यामुळे हे भारतीय चिकित्सापद्धतीवर भारतातच वक्रदृष्टी असल्यासारखे आहे, असा संताप आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जग जेरीस आले असताना जो-तो, उपचार सुचवित आहे. ते करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्लोरोईन, डेक्सामिथॉझोन इतकेच नव्हे तर काल-परवा सूचविलेली रेमडिसिव्हर ही महागडी उपचारपद्धती मान्य केली. प्रयोगांती यातील काही औषधी वापरण्यावर मनाई करण्यात आली. जगातील पंधराहून अधिक देशात कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरू आहे. ती केव्हा येईल? त्याची किंमत किती राहील हे कुणालाही सांगता येत नाही. असे असताना प्रयोगशीलतेसाठी ओळखल्या जाणाºया स्वदेशीचा ध्यास असलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी कोरोनील श्वासहारी व अनुतेलाचा उपयोग १०० रुग्णांवर करून त्यांना जो काही सकारात्मक निकाल मिळाला, त्याच्या आधारेच त्यांनी लोकोपयोगीसाठी सर्वांसमोर मांडला. कोट्यवधींची उलाढाल करणाºया पतंजलीकडे हे सर्व करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे परवाने नक्कीच असेल. संशोधानात १०० ही सॅम्पल साईज मान्य केली जाते. त्यातील ६९ टक्के व्यक्तींना सकारात्मक परिवर्तन आढळले ते मान्य करण्यासारखे आहे. या औषधीनिर्मित वापरलेली घटक द्रव्ये ही सुद्धा ‘फार्मोकोपीया’ मध्ये मान्यता असलेली आहे, असे असताना तिला थांबविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयसीएमआरने आयुष डॉक्टरांना नॉन मेडिकल संबोधले त्यावेळी आयुष ने साधा जाबही विचारला नाही. तर दुसरीकडे आयुषचे चिकित्सक अहोरात्र सेवा देत असताना त्यांना न मिळणाºया सोयी, सुविधा व मोबदल्यातील भेदभाव या विषयीही कुणी अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आयुष डॉक्टरांची ना शासनाला चिंता आहे ना आयुष मंत्रालयाला असेही आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आयुष स्वतंत्र मंत्रालय झाल्यावर भारतीय चिकित्सापद्धतीला सर्वत्र मान्यता मिळेल असे स्वप्न आयुषच्या २० लाखांवर चिकित्सक व कोट्यवधी भारतीयांनी पाहिले. त्या स्वप्नाची पूर्ती होण्याऐवजी चुराडा होताना दिसतोय. भारतीय चिकित्सापद्धतीच्या कार्याची, त्यातील संशोधनाची, त्यात कार्यरत आयुष डॉक्टरांची स्वत:च्या देशातच परवड होत असेल तर याला काय म्हणावे? आत्मनिर्भर व स्वदेशीचा मंत्र देणाºया शासनाने वेळीच हा अन्याय दूर केला नाही तर याचा केव्हाही विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ.श्याम भुतडा, आयुर्वेदाचार्य.

आयुष फक्त नावापुरते आहे. स्व:ता काही करायचे नाही आणि इतरांवर विश्वास ठेवायचा नाही, असाच प्रकार सुरु आहे. फक्त मंत्रालय काढून काम चालत नाही तर नवीन संशोधन, नवीन कल्पनेस चालना देणे हेही महत्त्वाच आहे. कोविडसारख्या रोगावर आजपर्यंत जगात औषध नाही. पारंपरिक औषध वापरुन चिनने आजारावर नियंत्रण मिळविले पण, आपल्याकडे आयुर्वेदाचार्य असतानाही, त्याचा उपयोग आपणास करता येत नाही, हेच आपले दुर्भाग्य आहे.
- नितीन मेशकर, आयुर्वेदाचार्य.

Web Title: The government's crooked view on Indian medicine in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य