शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विश्रामगृहाची ‘घडी’ विस्कटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

सिव्हिल लाईन परिसरात शासकीय विश्रामगृह आहे. गुरुवारी विश्रामगृह परिसर आणि आतील भागात फेरफटका मारला असता इमारत क्रमांक २ च्या भोजनकक्षातील प्रवेशद्वारावरील एक घड्याळ केवळ ४ वाजले असताना ५ वाजून ५१ मिनिटे तर भोजनकक्षाआतील घड्याळ १२ वाजून २८ मिनिटे अशा चुकीच्या वेळा दर्शवित होत्या. विशेष म्हणजे, या कक्षाशेजारीच ‘शरद’ कक्ष आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या डुलक्या : घड्याळी बंद; होतेय दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘घड्याळा’ने महाराष्ट्रातील विस्कटलेली राजकीय ‘घडी’ सुस्थितीत केली. येथील शासकीय विश्रामगृहातील घड्याळी मात्र चुकीच्या वेळा दर्शवित असल्याने या विभागाची ‘घडी’ सद्यस्थितीत विस्कटल्याचे चित्र आहे.सिव्हिल लाईन परिसरात शासकीय विश्रामगृह आहे. गुरुवारी विश्रामगृह परिसर आणि आतील भागात फेरफटका मारला असता इमारत क्रमांक २ च्या भोजनकक्षातील प्रवेशद्वारावरील एक घड्याळ केवळ ४ वाजले असताना ५ वाजून ५१ मिनिटे तर भोजनकक्षाआतील घड्याळ १२ वाजून २८ मिनिटे अशा चुकीच्या वेळा दर्शवित होत्या. विशेष म्हणजे, या कक्षाशेजारीच ‘शरद’ कक्ष आहे. या नावाभोवतीच सध्या अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे आणि शरद ऋतूलादेखील प्रारंभ झाला आहे. या ऋतूत निसर्ग कूस बदलतो. वृक्षांना हिरवीकंच पालवी फुटते आणि निसर्ग कात टाकतो. घड्याळ चिन्ह असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांच्यामुळे अनेक पक्षांनीही मरगळ झटकली आहे. सत्तास्थापनेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील विस्कटलेली राजकीय ‘घडी’ रुळावर आणली. मात्र, शासकीय विश्रामगृहातील घड्याळी चुकीच्या वेळा दाखवून संपूर्ण घटनाक्रमातील विरोधाभास दर्शवित आहे. विश्रामगृहातील बंद घड्याळींमुळे संपूर्ण विषयच गमतीदार झाला असून विश्रामगृह प्रशासनाच्या डुलक्याही यातून दिसत आहेत.विश्रामगृहात सातत्याने व्हीआयपी व्यक्तींची ये-जा सुरू असते. अशा स्थितीत बंद घड्याळी दिशाभूल करणाऱ्या ठरत आहेत. याकडे कर्मचारी आणि कार्यभार असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचेही सपशेल दुर्लक्ष आहे. घड्याळांची घडी सुस्थितीत करण्याची गरज व्यक्त होत आहे.हा हलगर्जीपणाच म्हणावा!शासकीय विश्रामगृहात व्हीआयपी, व्हीव्हीआयपींची सातत्याने ये-जा सुरू असते. त्यामुळे येथील व्यवस्था ही नीटनेटकीच असायला हवी. मात्र, विश्रामगृह प्रशासनाकडून अनेक कामात हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून येते. साधे घड्याळ कित्येक दिवसांपासून बंद असताना संबंधित अभियंत्याचे लक्ष कसे गेले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. कार्यकारी अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.