शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

सरकारची कामगिरी भारी; पेट्रोलने गाठली शंभरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST

स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात आम आदमी पार्टीच्या या धक्का मारो आंदोलनाला सुरुवात झाली. आराती चौकात प्रत्येकांच्या दुचाकीमध्ये दहा-दहा रुपयांचे ...

स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात आम आदमी पार्टीच्या या धक्का मारो आंदोलनाला सुरुवात झाली. आराती चौकात प्रत्येकांच्या दुचाकीमध्ये दहा-दहा रुपयांचे पेट्रोल भर वाहनांना धक्का मारून आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आधीच नागरिक कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात जीवन जगत आहेत. अशातच पेट्रोलची होणारी दरवाढ ही जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. एकीकडे दिल्लीमध्ये ८६.३० रुपयांत एक लिटर पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रामध्ये दिल्लीपेक्षा ६.१० रुपये अधिकचे मोजावे लागतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महागाई त्रस्त झाली असून, ही दरवाढ थांबवावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भोंमले, मंगेश शेंडे, अ‍ॅड. दुर्गाप्रसाद मेहेरे, नामदेवराव गुजरकर, रमेश खुरगे, प्रमोद भोयर, अविनाश श्रीराव, प्रकाश डोडानी, तुळशीदास वाघमारे, ममता कपूर, पूनम गुल्हाने, मयूर राऊत, हर्षल सहारे, सदानंद थूल, रवि बाराहाते, नितीन धोंगडे, राजू पठाण, चंद्रशील वाळूकर, संदीप डंभारे, नितीन झाडे, रवींद्र साहू, शेख कलाम, प्रवीण कलाल, खालिद खान, मुन्ना मन्सुरी, योगेश ठाकूर, गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-----------------------------------

इंधन दरवाढीविरुद्ध युवक काँग्रेसची निदर्शने

देऊरवाडा/आर्वी : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर आणि महागाई चांगलीच वाढल्याने याविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनकरून नागरिकांना जिलेबीचे वितरण केले. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सततच्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. मध्यमवर्गीयांचे सर्व बजेट बिघडले आहे. टॅक्सी, ऑटोरिक्षा या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने या दरवाढीचा तीव्र निषेध केला आहे. आर्वी-तळेगाव मार्गावरील एका पेट्रोल पंपावर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात विशाल साबळे, सागर शिरपूरकर, नीलेश महाजन, समर्थ खुणे, देवेंद्र तळेकर, मनीष चावरे, विशाल जाधव, विशाल बोके, धर्मेश शर्मा, मंथन कांबळी, गजानन निंबेकर, अक्षय सावंत, प्रज्योत दानव, नितेश राऊत, सागर वरखडे, रितिक वडणारे, मुशरफ मुल्ला, अंगत गिरधर, बिट्टू मुल्ला, नौफिल खान, अमोल सुरवाडे, अमित खंडाते, राहुल कुरसंगे, प्रशांत कावडकर, समीर चोरे, गुणवंत बनसोड, मनीष शिवणकर व नरेश तवणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------

शिवसैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वर्धा : गेल्या वर्षभरापासून पेट्रोलियम वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना ही दरवाढ आता त्रासदायक ठरली आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली. केंद्र सरकारने नुकताच घरगुती गॅस सिलिंडरचे दर ७७१ रुपये, पेट्रोल ९३ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ८३ रुपये प्रतिलिटर केले आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांना जगणे कठीण करणारी असल्याने तत्काळ हे दर कमी करावे, या मागणीकरिता मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. सोबतच उत्तम गलवा कंपनीतील अपघातात जखमी झालेल्या कामगारांना पाच लाखांची आर्थिक मदत द्यावी, तसेच कायमचे अपंगत्व आलेल्यांचा रोजगार कायम ठेवून परिवारातील सदस्यांना रोजगार द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत शहागडकर यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे, गणेश इखार, अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर, तालुकाप्रमुख सुनील पारिसे, श्रीकांत मिरापूरकर, भालचंद्र साटोने, शहर संघटक बालू वसू, गणेश पांडे, पुलगाव शहर प्रमुख नाना माहुरे, मिलिंद शहागडकर, अमित बाचले, महेश शास्त्री, मोहन निंबाळकर, मिथुन उईके, अमर दांडदे, नेहारे, प्रियांशू रघुवंशी, अर्पित ठाकरे, इर्शाद पठाण, मयूर शर्मा, पवन चावरे, बिट्टू शेंडे आदी शिवसैनिकांचा सहभाग होता.