शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्यासाठी गोपालक, शेतकऱ्यांची भटकंती

By admin | Updated: April 20, 2016 02:23 IST

अपूरा पाऊस आणि काही पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ यामुळे गत काही वर्षांत चारा टंचाईने डोके वर काढले आहे.

दुधाचे भाव भिडणार गगणाला : ज्वारीच्या अल्प पेऱ्याचाही परिणामवर्धा : अपूरा पाऊस आणि काही पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ यामुळे गत काही वर्षांत चारा टंचाईने डोके वर काढले आहे. यावर्षी गुरांसाठी वैरण उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसह गोपालकांना वैरणासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुरांसाठी जिल्ह्यात चाराडेपो सुरू करावे, अशी मागणीही या अनुषंगाने समोर येत आहे.गुरांसाठी आवश्यक असलेले वैरण शोधूनही मिळत नसल्याने बाजारपेठेत मिळणारे पशुखाद्य विकत घेण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. हिरवे वैरण उपलब्ध नसल्याने दुधाच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊन दुग्धजन्य पदार्थाचे भाव वाढू लागले आहेत. परिसरातील अनेक पशुपालक शेतकरी वैरणाच्या शोधात भटकंती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांसह पक्ष्यांमुळे काहीही हाती येत नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढल्याचे दिसते. परिसरातील बारा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून या व्यवसायाची शेतकऱ्यांनी निवड केली. त्यावेळी गुरांना लागणारे वैरण मुबलक उपलब्ध होते. जंगलाचे प्रमाण अधिक होते. जंगली श्वापदांचे प्रमाण कमी होते. आता गुरांचे प्रमाण भरपूर असताना वैरणाचे प्रमाण नगण्य आहे. ज्वारीचा पेरा नगन्य असल्याने कडबा मिळत नाही. तूर, सोयाबीन व गहु या पिकांपासून मिळणारे वैरण निसर्गाच्या लहरीपणामुळे दुरापास्त झाले आहे. यावर्षी सोयाबीनची सवंगणी व मळणी न झाल्याने ते वैरणच उपयोगात आले नाही. गारपिटीमुळे गव्हाचे पीक हातून गेले. नगण्य प्रमाणात गव्हांडा हाती लागला. तुरीचे वैरणही हाती आले; पण प्रत्येक शेतकऱ्याला जनावरांची भुक भागविण्याकरिता आवश्यक असल्याने त्या वैरणाची विक्री केली जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसात गुरांना हिरवा चारा हवा असतो. यासाठी ऊसाच्या पाला उपयोगात आणला जात होता; पण आता ऊसाचेही क्षेत्र घटत असल्याने पाला मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी स्वत:च्या शेतात कड्याळू वा मक्याची पेरणी करतात. यासाठीही ओलिताची सोय गरजेची आहे. शिवाय रानडुकरही यावर ताव मारतात. यामुळे चारा मिळणेच कठीण झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)