Give 50 lakhs to those killed in a tiger attack | वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना ५० लाख द्या
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना ५० लाख द्या

ठळक मुद्देविविध ठराव पारित : शेत जागर मंचची जंगल परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नमवारग्राम : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी, शेतमजूर यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आर्थिक मदत देण्यात यावी, शासनाने जंगलव्याप्त क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी काटेरी कुंपण निशुल्क करून द्यावे, असे ठराव बांगडापूर येथे पार पडलेल्या शेत जागर मंचाच्या जंगल परिषदेत पारित करण्यात आले.
या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बापुराव कडवे, मनोहर पठाडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या सभेमध्ये अकोला येथील कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी जंगल परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. आज शेतकरी पेरणीपासून शेतमाल निघेपर्यंत शेतात रात्री जागतो. परंतु जंगलात रोही, डुकर, हरिण, वाघ आदी वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वनविभाग पंचनामा करून इतर कागदपत्राची पुर्तता केल्यावरही नाममात्र मदत हातात ठेवतात. त्यामुळे या परिसरातील अर्धी अधिक जमीन पडीत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहचावी या येथे जंगल परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे गावंडे यांनी सांगितले. सदर जंगल परिषदेची सांगता शेतकºयांनी आणलेल्या शिदोºयामधील अन्नग्रहण करून अभिनव पध्दतीने करण्यात आली. या परिषदेला कन्नमवारग्राम, हेटीकुंडी, सावळी, आगरगाव, बोरी, धर्ती, नांदोरा (हेटी), सिंदीविहीरी, आंभोरा आदी गावातील शेतकरी, शेतमजुर उपस्थित होते. या जागरण परिषदेचे कुणीही अध्यक्ष नाही, कुणीही सदस्य होवू शकता व आपल्या परिसरातील जनतेला सोबत घेवून आपणच आपले प्रश्न सोडवावे असेही आवाहन करण्यात आले. जंगल व्याप्त भागात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.

जागर परिषदेचे काम हे अकोला जिल्ह्यात सुरू झाले. आज संपूर्ण राज्यात या परिषदेचे काम सुरू होत आहे. कुणाकडून वर्गणीसुद्धा घेतली जात नाही. सर्वसामान्य माणसाचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत. या संघटनेत कोणतेही पद नाही.
- रवी पाटील (अरबट),अकोला.

Web Title: Give 50 lakhs to those killed in a tiger attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.