शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’चे भूत पुन्हा मानगुटीवर

By admin | Updated: November 15, 2014 22:51 IST

मागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड

प्रभाकर गायकवाड ल्ल पिंपळखुटामागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे़ डीएड, बीएड झाल्यानंतरही पात्रता सिद्ध करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही परीक्षा म्हणजे बेरोजगारांना लुटण्याचा घाट असल्याच्या प्रतिक्रीया आता बेरोजगारांतून उमटत आहेत़मागील वर्षी केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच उत्तीर्ण करता आलेली टीईटी परीक्षा अनेक घोळांमुळे गाजली होती़ या परीक्षेच्या माध्यमातून मागील वर्षी शासनाने ३० कोटी रुपयांचा भुर्दंड बेरोजगार भावी शिक्षकांवर लादला होता़ यंदाही मागील वर्षीप्रमाणे डिसेंबर २०१४ मध्ये पुन्हा टीईटी परीक्षेचा घाट शासनाने घातला आहे़ शिक्षण अधिकार कायद्यानुसार ५-३-२ चा फॉर्म्यूला अंमलात आणला असून पहिल्या स्तरात इयत्ता बारावी डीएड तर दुसऱ्या स्तरात पदवीधर शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य आहे़ शासनाने यासाठी प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य केली आहे़एका स्तरासाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये तर दोन्ही परीक्षांसाठी ८०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे़ मागील परीक्षेतही असेच शुल्क आकारण्यात आले होते़ त्यावेळी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ या परीक्षेत अनेक त्रुट्या राहिल्याने केवळ पाच टक्केच निकाल लागला होता़ शासनाची मात्र कोट्यवधीची कमाई झाली़ टीईटी पास होणे म्हणजे नोकरी नव्हे ती केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची परीक्षा आहे़ गतवेळी उत्तीर्ण झालेले हजारो बेरोजगार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत़ दरम्यान, शिक्षण अधिकार कायद्यानुसार नव्याने करण्यात आलेल्या संच मान्यतेत हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ या शिक्षकांचे समायोजन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे़ समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊनही शिक्षक अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे़ अशी अवस्था असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे़ १४ डिसेंबर २०१४ रोजी ही परीक्षा होत आहे़ यंदाही पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारण्यात आले आहे़ नोकरीची कुठलीही हमी नसताना परीक्षा पास झाल्यानंतर केवळ प्रमाणपत्र हातात घेऊन फिरणाऱ्या तरूणांकडून परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा संताप बेरोजगारांकडून व्यक्त होत आहे़