सामूहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 16:51 IST2018-10-21T16:41:33+5:302018-10-21T16:51:55+5:30

सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

gangrape and murder of minor girl in vardha | सामूहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

सामूहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

वर्धा - सामूहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा शहरानजीकच्या सावंगी (मेघे)-पालोती मार्गावर शनिवारी सायंकाळी उशीरा एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. मृत तरुणीची ओळख पटविण्यासह तिच्या दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना अवघ्या आठ तासात यश आले आहे. 

मृत मुलगीही अल्पवयीन असून ती आर्वी नाका भागातील गजानन नगर परिसरातील रहिवासी आहे. तिच्यावर दोन्ही अल्पवयीन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीकडून मुख्य आरोपीला लग्नाची गळ लावली जात होती. त्यामुळे तिचा काटा काढण्यात आल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

Web Title: gangrape and murder of minor girl in vardha