सागवान चोरांची टोळी जेरबंद

By Admin | Updated: June 20, 2017 01:05 IST2017-06-20T01:05:34+5:302017-06-20T01:05:34+5:30

तालुक्यातील जंगलातील सागाचे मोठे झाड तोडून चोरीच्या मार्गाने विकणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे.

The gang of thieves burglar jerband | सागवान चोरांची टोळी जेरबंद

सागवान चोरांची टोळी जेरबंद

तिघांवर वन गुन्हा : दोघांना अटक, सागवान जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यातील जंगलातील सागाचे मोठे झाड तोडून चोरीच्या मार्गाने विकणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांवर सोमवारी वन गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.
येथील अन्वर शहा (३५) याने पंजीलाल उईके (४०) याला जंगलातील सागाचे झाड तोडून सर्व मुद्देमाल अन्वरच्या सांगण्यावरून त्याच्या घरी, काही अन्वरच्या शेतात तर काही त्याचा भाऊ हारुण शहा याच्या शेतात ठेवत होता. दरम्यान १८ जून रोजी सिंदीविहीरा बीटमध्ये तळेगाव वनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक एस.आर. देशमुख व काही वनरक्षक जंगलात रोपवणाची पाहणी करायला गेले होते. त्यांना कुऱ्हाडीने काहीतरी तोडल्याचा आवाज येवू लागला. त्या आवाजाच्या दिशेने कर्मचारी गेले असता पंजीलाल सागाचे मोठे झाड कापताना दिसला. त्याला ताब्यात घेवून सविस्तर चौकशी केली असता सदर कारनामा अन्वर शहा याच्या सांगण्यावरून करीत असल्याचे समोर आले.
सोमवारी आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी तळेगावचे क्षेत्रसहाय्यक एस.आर. देशमुख यांनी संयुक्त कारवाई करीत आरोपी पंजीलाल उईके, हारुण शहा या दोघांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी अन्वर शहा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अधिक माहितीमध्ये वनविभागाला मोठया प्रमाणात सागवान असल्याचे समजल्यावर दोन्ही आरोपीचे शेत, घर याची झडती घेण्यात आली. यामध्ये गोठ्यात व शेतात सागवान साठवून असल्याचे दिसून आले. या कारवाईत ४८ हजार रुपयांचे ५०० फुट सागवान जप्त करण्यात आले. याआधी तोडलेली झाड किती, मुद्देमाल किती विकला याची माहिती आरोपीकडून घेणे सुरू आहे. याप्रकरणी अवैध वृक्षतोड १९२७ चे कलम (३३) अन्वये आरोपींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला.

वन्यप्राणी शिकारीचे पुरावे
अवैध सागवान वृक्षतोड विक्रीसोबतच आरोपी अन्वर शहा याच्या गोठ्यामधून ठिपक्याच्या चितळाचे चार नग सिंग पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. वन्यप्राण्यांची शिकार करून विकणे यासाठी आरोपी अन्वर शहा याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९ अन्वये वनगुन्हा दाखल केला. या दोन्ही प्रकरणाची दखल वनविभागाने घेतली असून आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Web Title: The gang of thieves burglar jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.