शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गांधीवर तेव्हाही आरोप झाले अन् आताही होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:34 IST

गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती.

ठळक मुद्देअपूर्वानंद झा : ‘गांधींचा मृत्यू’ विषयावर सेवाग्राम आश्रमात विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती. देशात अल्पसंख्यकांच्या नैतिक अधिकाराचे संरक्षण व्हायला पाहिजे, असाही प्रयत्न त्यांचा होता. गांधींवर खोटे आरोप सतत केल्या गेले; शिवाय ते आजही होत आहेत. त्यातील काही मंत्री तर काही प्रधानमंत्री झाले. गांधींना बदनाम करणे सुरूच असल्याने आज खऱ्या अर्थाने गांधीजींचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी केले.सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘गांधींचा मृत्यू’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू तर प्रमुख अतिथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. अपूर्वानंद झा पुढे म्हणाले, गांधीजींनी प्रार्थनेला खुप महत्त्व दिले. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत विरोध झाला त्यावेळी बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळुहळू होत असतो तसेच गांधीजी सुद्धा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केली असेही झा यांनी सांगितले. देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्पात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. त्यावेळीही मोठा विरोध झाला; पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेत घाबरू नका, घर सोडू नका, हिंसा करू नका, असे आवाहन करू लागले. भेटी, आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले. तर दुसरीकडे कलकत्ता, पंजाब, दिल्ली येथेही दंगली सुरू झाल्या होत्या. दिल्लीत १९४७ मध्ये धार्मिक दंगल भडकली असता गांधीजी दिल्लीत आले. दिल्लीत शरनार्थींची संख्या वाढली. बुढ्ढा मरता है तो मरने दो असे विरोधक म्हणायला लागले. मात्र बापू शांती, अमनसाठी प्रयत्नरत होते. १२५ वर्ष जगण्याची इच्छा ठेवणाºया बापूंना मात्र दंगलीने आता एक दिवस, पण जगायचे नाही असे म्हणायला लावले. उपोषणाचा निर्णय घेताला. तीन दिवसात हिंसाचार थांबला आणि शांती निर्माण झाली. गांधीजीवर सहा हल्ले झाले. त्यातील एक सेवाग्राम आश्रम पुढे झाला. हिंदूना नामर्द बणविले, पाकिस्तानला ५५ कोटी दिले, पाकिस्तानातील हिंदूवर अत्याचार झाला; पण गांधीजींनी काहीही केले नाही. ते देशातील मुस्लीमांची बाजू घेतात असा सनातन्यांनी वारंवार आरोप केला. शिवाय आजही तो केल्या जात आहे. वास्तवात गांधींमुळे खेड्यापासून तर शहरापर्यंत तसेच विदेशातील महिला प्रभावित होऊन गांधीजींच्या चळवळीत व स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या. देशात व पाकिस्तानात ज्या दगली भडकल्या त्या थांबविण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत होते. बँ.जीना सोबत चर्चा करीत होते. त्यांनी लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला होता. जीनानी वचन पाळावे, असे गांधीजींनी सांगितले होते. मग गांधी काहीच करीत नाही हा आरोप मुळातच खोटा असून गांधींना बदनाम आणि मारण्यासाठी सतत प्रयत्न होत असल्याचे दिसून असल्याचे यावेळी प्रा. डॉ. झा यांनी स्पष्ट केले. संचालन जीवन अवथरे यांनी केले.बापूंची हत्याच झालीबापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनीही गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधींपासून असल्याचे ते मानत. गांधीजींची हत्या झाली तिही प्रार्थनेला जाताना. गोडसे बापूंच्या पाया पडले नंतरच त्यांनी गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम