शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले, गाडेगावच्या सरपंच अखेर पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 18:39 IST2022-02-02T16:17:29+5:302022-02-02T18:39:29+5:30
मतदारांनी थेट निवडून दिलेल्या सरपंच सविता भोयर यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात गावातीलच संजय गिरी यांनी प्रथम जिल्हाधिकारी वर्धा यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले.

शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले, गाडेगावच्या सरपंच अखेर पायउतार
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील आठ सदस्य ग्रामपंचायत असलेल्या गाडेगाव येथील सरपंच सविता महेश भोयर यांना नागपूर विभागाचे अपर आयुक्तांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. त्यांच्यावर शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आला असून, अपर आयुक्तांच्या निर्णयामुळे भोयर यांच्या अडचणीत भर पडली आहे.
मतदारांनी थेट निवडून दिलेल्या सरपंच सविता भोयर यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात गावातीलच संजय गिरी यांनी प्रथम जिल्हाधिकारी वर्धा यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यात सरपंच सविता भोयर यांचे सासरे नामदेव भोयर यांनी राहत्या घरासमोर २० बाय १० फुट जागेवर टिनाचे शेड उभे करून शासकीय जागा काबीज केली होती. त्यात त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडून दिलासा मिळाला होता, पण संजय गिरी यांनी याच निकालाला आवाहन देणारी याचिका अपर आयुक्तांकडे दाखल केली.
हे प्रकरण संजय गिरीविरुद्ध गैरअपिलार्थी सविता महेश भोयर, गटविकास अधिकारी पं. स. हिंगणघाट, सचिव ग्रा. पं. गाडेगाव, जिल्हाधिकारी वर्धा असे राहिले. याप्रकरणी युक्तिवाद करताना विविध पुरावे सादर करून बाजू मांडण्यात आली. शिवाय गैरअपिलार्थी एक यांनी शेत सर्व्हे क्र. ११३ जागा २.२८ आराजी मौजा गाडेगाव येथील शेताला लागून असलेल्या सर्व्हे क्र. ७ फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण केले ते मोजी अंति निष्पण झाले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन अपर आयुक्तांनी गाडेगाव येथील सरपंच सविता भोयर यांनी अपात्र घोषित केले. विशेष म्हणजे सद्यस्थितीत गावातील उपसरपंच आणि सरपंच हे दोन्ही पद रिक्त आहेत. उपसरपंच हे अतिक्रमणामध्ये अपात्र झाले आहेत