कृषी सहायक आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू
By Admin | Updated: June 23, 2017 01:38 IST2017-06-23T01:38:51+5:302017-06-23T01:38:51+5:30
मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात

कृषी सहायक आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू
१ जुलैला पुण्यात मोर्चा : आकृतीबंध तयार करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. वर्धा जिल्ह्यातही या राज्यव्यापी आंदोलनाचे लोण पसरले आहे.
चौथ्या टप्प्यात २१ ते २३ जून या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले. त्यानंतर २७ जून रोजी विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कार्यालयावर धरणे देण्यात येणार आहे व १ जुलै रोजी आयुक्त कृषी, पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याची माहिती कृषी सहाय्यक संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष चेतन ठाकरे, कार्याध्यक्ष उमेशसिंग उमाळे, सचिव आनंद मून यांनी दिली आहे. राज्य सरकाने ३१ मे २०१७ रोजी स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला; परंतु कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे आपल्या पाच मागण्यांसाठी कृषी सहायकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.