शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध तस्करी करणारे चार ट्रक जप्त

By admin | Updated: February 20, 2017 01:11 IST

लिलाव न झालेल्या रेतीघाटांवरून अमरावती येथे तस्करी करणारे चार ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.

२४.७२ लाखांचा ऐवज सील : ट्रक चालकांना अटक; मालकांवरही गुन्हे वर्धा : लिलाव न झालेल्या रेतीघाटांवरून अमरावती येथे तस्करी करणारे चार ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली. यात २४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चारही ट्रक चालकांना अटक करून ट्रक मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुलगाव येथे ही कारवाई केली. राहुल डोलारे, प्रल्हाद राऊत, गणेश धुर्वे आणि दीपक वानखेडे सर्व रा. अमरावती अशी अटकेत असलेल्या ट्रक चालकांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर या चार पैकी तीन ट्रक अमरावती येथील नदीम अश्पाक महंमद अब्दुल सतीर याचे असल्याचे समोर आले. तर अन्य एक ट्रक मज्जू शहा वल्द मकबुल शहा रा. अमरावती याचा असून या दोघांवरही भादंविच्या गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळी तालुक्यातील वाघोली आणि निमगव्हाण येथील रेती घाटाचा लिलाव झाला नसताना येथून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी करून या घाटावरून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ कुठलाही परवाना नसल्याचे दिसून आले. यावरून चारही ट्रक जप्त करून ठाण्यात उभे करण्यात आले. या कारवाईत ७२ हजार रुपयांची रेती आणि ट्रक जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, उपनिरीक्षक आचल मलकापुरे, सहायक उपनिरीक्षक उदयसिंह बारवाल, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमल, सचीन खैरकार, समीर कडवे व संजय ठोंबरे यांनी केली.(प्रतिनिधी) रेतीचोरी करताना ट्रॅक्टर जप्तवर्धा - रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असताना पोलिसांनी ट्रॅक्टरसह रेतीसाठा जप्त केला. ही कारवाई देवळी एमआयडीसी परिसरात रविवारी सकाळी केली. पोलीस सुत्रानुसार, देविदास धुर्वे ट्रॅक्टर क्र.एम.एच.३२-१४९९ ने रेती घेऊन येत होता. पोलिसांनी वाहन थांबवून कागदपत्राची तपासणी केली, असता त्याच्याकडे कोणतेच कागदपत्र आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत ५ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त के ला आहे.