शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

चार कोरोनाबाधित; एका रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

वर्धा शहरातील गोलबाजार परिसरातील टिळक चौकामध्ये रहिवासी असलेली ५४ वर्षीय महिला मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजारावरील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेण्यात आले असता त्यांची २८ वर्षीय सूनही कोरोनाबाधित आढळून आली.

ठळक मुद्देवर्ध्यासह काकडा येथे दोन रुग्ण : गोलबाजार परिसर केला सील

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/कारंजा (घा.) : दिवसागणिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. मंगळवारी चार रुग्ण आढळले असून यामध्ये कारंजा तालुक्यातील काकडा या गावातील दोन तर वर्धा शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहेत. यातील वर्ध्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.वर्धा शहरातील गोलबाजार परिसरातील टिळक चौकामध्ये रहिवासी असलेली ५४ वर्षीय महिला मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजारावरील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेण्यात आले असता त्यांची २८ वर्षीय सूनही कोरोनाबाधित आढळून आली.तर काकडा येथील सहा रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी ७० आणि ७४ वर्षीय दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे १५०० लोकसंख्येच्या गावात आतापर्यंत १२ रुग्ण आढळल्याने गाव हॉटस्पॉट ठरत आहे.मृताच्या परिवाराच्या पाच प्रतिष्ठानांना टाळेगोलबाजार परिसरात आढळलेल्या एकाच परिवारातील दोन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने येथील परिसर सील करण्यात आला. सोबतच या परिवाराची शहरात ठिकठिकाणी असलेली पाच प्रतिष्ठानेही सील करण्यात आली आहे. या रुग्णांच्या हायरिक्समधील १९ तर लोरिक्समधील ५० पेक्षा अधिक रुग्णांना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहे. सोबतच संपर्कातील इतरही व्यक्तींचा शोध सुरु केला आहे.शहरातील नागरिकांनी बाहेर जिल्ह्यात जात असल्यास त्यासंदर्भात आरोग्य, महसूल किंवा पालिका प्रशासनाला माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच घरोघरी सर्वेक्षणाकरिता येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देवून सहकार्य करावे.सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या