शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; सीआरपीएफच्या जवानासह दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:45 AM

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे वाहन गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास अपघातग्रस्त झाले.

ठळक मुद्देसीआरपीएफचे दोन जवान ठार  भरधाव वाहन कंटेनरवर आदळले  चंद्रपूर - नागपूर मार्गावर अपघात  जखमींना नागपुरात हलविले 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा-

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे भरधाव वाहन कंटेनरवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ)  जवानासह दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर आहे . गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास चंद्रपूरहून नागपूरला जात असताना जामजवळच्या कांडळी नदीजवळ  हा भीषण अपघात झाला.  अहीर यांचे वाहन पुढे निघून गेल्याने ते या अपघातातून बचावले. गुरुवारी सकाळी अहिर चंद्रपूरहून नागपूरला यायला निघाले. त्यांच्या मागेपुढे सुरक्षा रक्षकांच्या वाहनांचा काफिला होता. ज्या वाहनात अहीर बसले होते. समोरच्या कंटेनरच्या बाजूने ते  वाहन समोर निघून गेल्यानंतर मागच्या वाहनाच्या समोर अचानक एक प्राणी आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरच्या चालकाने अचानक करकचून ब्रेक मारले. त्यामुळे अहीर यांच्या ताफ्यातील अतिशय वेगात असलेले सीआरपीएफ जवानांचे वाहन कंटनरवर धडकले. या वाहनाचा वेग अधिक असल्याने सुरक्षा रक्षकांचे वाहनाची पुरती मोडतोड झाली. या वाहनात चालक विनोद झाडे,  एएसआय विजयकुमार, फलजीभाई पटेल, एम.जी. साजिद, दीपककुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगट (सर्व सीआरपीएफ जवान) असे सातजण त्या गाडीत होते. त्यापैकी वाहनचालक विनोद विठ्ठलराव झाडे (वय ३७, रा. चंद्रपूर) आणि सीआरपीएफचे जवान फलजीभाई पटेल यांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता वाहनातील सर्व जण अक्षरश: त्यात अडकून पडले. मागे असलेल्या आणि पुढे निघून गेलेल्या जवानांनी अपघातग्रस्त वाहनातील जवानांना लगेच बाहेर काढले. समोर निघून जात असलेले अहीर यांनी आपले वाहन माघारी फिरवून अपघातग्रस्तांना तातडीने नागपूरच्या इस्पितळात नेण्याची व्यवस्था केली.   अपघातस्थळी, रुग्णालयात प्रचंड गर्दीवर्दळीच्या मार्गावर हा भीषण अपघात घडल्यामुळे अपघातानंतर अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली. जखमींना नागपुरातील एका खासगी इस्पितळात दाखल केल्याचे कळताच येथेही पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सीआरपीएफचे अधिकारी तसेच पोलीस अधिका-यांसह भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत धाव घेतली. 

टॅग्स :AccidentअपघातHansraj Ahirहंसराज अहिर