वर्ध्यामध्ये वनविभागाच्या अधिका-यांचा बनावट सॉ मीलवर छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 17:30 IST2017-11-13T17:30:02+5:302017-11-13T17:30:57+5:30
वर्धा येथे वनविभागाच्या अधिका-यांकडून सोमवारी (13 नोव्हेंबर) स्थानिक बजाज चौक भागातील बनावट सॉ मीलवर छापा टाकण्यात आला.

वर्ध्यामध्ये वनविभागाच्या अधिका-यांचा बनावट सॉ मीलवर छापा
वर्धा - वनविभागाच्या अधिका-यांकडून सोमवारी (13 नोव्हेंबर) स्थानिक बजाज चौक भागातील बनावट सॉ मीलवर छापा टाकण्यात आला. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाखाली असलेल्या भरतकुमार मनसुखलाल पटेलीया यांच्या मालकीच्या सॉ मीलवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात लाकूड व लाकूड कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. वनविभागाच्या अधिका-यांनी या कारवाई दरम्यान एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एस. जी. बढेकर, वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. बनसोड, यु. व्ही. सिरकुडकर, आर. व्ही. राऊत, बी. डब्ल्यु इंगळे, ए.के. कांडलकर, शेख तसेच पोलीस कर्मचारी सुनील चोपडे, विशाल देवतळे यांनी केली.