कारंजात महामार्गावर उड्डाणपूल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:23 IST2018-07-30T00:21:44+5:302018-07-30T00:23:11+5:30
जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा .......

कारंजात महामार्गावर उड्डाणपूल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लेखी निवेदनातून केली. खासदार रामदास तडस यांनी ना.नितीन गडकरी यांना सांगितले की, कारंजा घाडगे हे तहसील मुख्यालयाचे नगरपंचायत असलेले महत्वाचे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती आहे. शाळा, दवाखाना, न्यायालय, बसस्टँड, बाजारपेठ, सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, महाविद्यालय अश्या महत्वाच्या ठिकाणी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडांवा लागतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उड्डाण पूल नसल्यामुळे अनेक भीषण अपघात देखील झालेले आहे. या सर्व बाबीचा गंभीरतेने विचार करुन २९ जून २०१६ रोजी कारंजा घाडगे येथे उडाणपुल निर्माण करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग नागपूर कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव दिल्ली मुख्यालयी पाठविला होता. या प्रलंबीत प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन कारंजा घाडगे जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी केली. निर्माण होत असलेल्या बुट्टीबोरी-वर्धा-यवतमाळ महामार्ग निर्माण कार्य सर्व प्रमुख शहर केळझर, सेलू, वर्धा, सालोड, देवळी, व कळंब येथे बाह्यवळण रस्ते तयार करण्यात येत आहे. यामुळे सर्व जड वाहणे शहरातील बाहेरुण प्रवास करतील अशी रचना आहे. परंतु कॉग्रेंस शासनाच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आलेल्या महामार्गामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षेचे उपाय व सामान्य नागरिकांच्या मागणीची दखल घेतली गेली नव्हती असे ही खा. तडस यांनी त्यांना सांगितले.वर्धा लोकसभा मतदार संघातील जांब चौरस्ता, हिंगणघाट शहरातील नांदगांव चौरस्ता येथील उड्डाण कार्याला नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून मान्यता मिळालेली आहे.
सदर कामे लवकरच प्रारंभ होणार आहे. अशी प्रतिक्रीया खासदार रामदास तडस यांनी दिली. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सुचनेनुसार कारंजा घाडगे उड्डाणपुलाकरिता लवकरच बैठकीचे आयोजन करुन हा प्रश्न देखील भारत सरकार नक्कीच मार्गी लावेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.
महिना भरात दोघांचे गेले जीव
कारंजा धाडगे येथे महामार्ग ओलांडताना गेल्या महिना भरात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुलगा रूग्णालयात होता त्या जेवनाचा डबा देण्यासाठी जाणाऱ्या वडीलाला अपघात झाला व ते मरण पावले. तर कारंजा येथील एका हॉटेल मध्ये काम करणाऱ्या एका नोकराला महामार्गावर वाहनाची वाट पाहत असताना अपघात झाला यात त्यांचा मृत्यू झाला.तो परप्रांतीय युवक होता. याशिवाय अनेक किरकोळ अपघात येथे पुलाअभावी झाले आहेत.