जिल्ह्यातील पहिला नेट मीटरिंग सौर प्रकल्प वर्धेत
By Admin | Updated: July 17, 2016 00:34 IST2016-07-17T00:34:45+5:302016-07-17T00:34:45+5:30
महाराष्ट्र शासन व महावितरणने जाहीर केलेल्या नवीन रूफ टॉप सोलर व नेट मीटरिंग धोरणानुसार जिल्ह्यातील...

जिल्ह्यातील पहिला नेट मीटरिंग सौर प्रकल्प वर्धेत
रुफ टॉप सोलर : दररोज १० युनीट वीज क्षमता
वर्धा : महाराष्ट्र शासन व महावितरणने जाहीर केलेल्या नवीन रूफ टॉप सोलर व नेट मीटरिंग धोरणानुसार जिल्ह्यातील पहिला छतावरील सौर उर्जा प्रकल्प पराग राजेंद्र कानोडे यांच्या घरी कार्यान्वित करण्यात आला आहे. रामनगर कमला नेहरू शाळेसमोर या त्यांच्या राहत्या घरी हा प्रकल्प असून दोन किलो वॅट शक्तीचा आहे. दररोज १० युनिट वीज तयार करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.
सदर प्रकल्प वर्धेतील अशोक भिवगडे यांनी तयार करून दिला आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पैकीने तसेच सहायक अभियंता सोनस्कर यांचे मार्गदर्शन तसेच सहकार्याने महावितरणशी संलग्न करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १ लाख ७५ हजार रुपये इतका खर्च आला आहे. सदर खर्च केंद्र तथा महाराष्ट्र शासनाची कुठलीही सबसिडी न घेता पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रकल्प धारक कानोडे यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)