वर्ध्यातील टिळक बाजाराला आग, सर्व दुकाने जळून खाक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 11:01 IST2021-02-28T11:01:20+5:302021-02-28T11:01:51+5:30

Fire at Tilak Bazaar in Wardha : शहरातील भाजी बाजार नावाने प्रसिद्ध असलेल्या गोल बाजारात रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

Fire at Tilak Bazaar in Wardha, burn down all shops! | वर्ध्यातील टिळक बाजाराला आग, सर्व दुकाने जळून खाक! 

वर्ध्यातील टिळक बाजाराला आग, सर्व दुकाने जळून खाक! 

वर्धा : शहरातील टिळक मार्केट परिसरात असलेल्या गोल बाजाराला आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत भाजीविक्रीचे संपूर्ण दुकाने जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

शहरातील भाजी बाजार नावाने प्रसिद्ध असलेल्या गोल बाजारात रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. याची माहिती नागरिकांना मिळताच  आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण भाजी दुकाने जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. पण आगीवर नियंत्रण दहा वाजेपर्यंत ही मिळू शकले नाही. घटनास्थळी  उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे ते दाखल झाले त्यांनी संपूर्ण पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच इतर दुकाने  खाली करण्याचे सांगितले.

Web Title: Fire at Tilak Bazaar in Wardha, burn down all shops!

टॅग्स :fireआग