भरधाव कार झाडाला धडकली
By Admin | Updated: June 23, 2017 01:33 IST2017-06-23T01:33:06+5:302017-06-23T01:33:06+5:30
माळेगाव(ठेका) मार्गावर झालेल्या अपघातात भरधाव कार अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली.

भरधाव कार झाडाला धडकली
माळेगाव (ठेका) मार्गावरील घटना : एक ठार, दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : माळेगाव(ठेका) मार्गावर झालेल्या अपघातात भरधाव कार अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली. यात कारमधील एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शांता माधव नगराळे रा. वर्धा असे मृत महिलेचे नाव आहे, तर अरविंद नत्थुजी तायडे, नंदा अरविंद तायडे रा. पुलगाव हे दोघे जखमी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद तायडे हे कुटुंबियांसह कार क्रमांक एम.एच. ३२ वाय-३४८१ ने माळेगाव (ठेका) येथील त्यांच्या नातेवाईकाकडे गेले होते. रात्रीच्या सुमारास पुलगावकडे जात असताना बोरखेडी वळणावर रस्त्याच्या कडेला सागाच्या झाडाला कारने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात वाहनाचा चुराडा झाला. धडकेमुळे सागाचे झाड तुटून पडले असून कारचे स्ंिटअरिंग वाहनापासून वेगळे झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. वाटेत शांता नगराळे यांचा मृत्यू झाला. जखमी पती-पत्नीवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेचा पंचनामा खरांगणा ठाण्याचे गजानन बावणे, रामचंद्र गेडाम, राजेश शेंडे यांनी केला. अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी ठाण्यात जमा केले. कारचा पुढचा भाग क्षतीग्रस्त झाला आहे.