एकीकडे कोरोनाचे भय तर दुसरीकडे मुलभूत गरजांची निकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:49 IST2020-04-16T12:48:33+5:302020-04-16T12:49:03+5:30
कोरोनाचे अदृश्य हात दिवसेंदिवस जवळ येत असल्याचे जाणवत असतानाही आपल्या मुलभूत गरजांसाठी कोरोनाचा धोका पत्करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये तयार होतेय की काय, अशी शंका यावी असे दृष्य वर्धा जिल्ह्यातल्या वायगाव येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडीबाजारात पहावयास मिळत आहे.

एकीकडे कोरोनाचे भय तर दुसरीकडे मुलभूत गरजांची निकड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोरोनाचे अदृश्य हात दिवसेंदिवस जवळ येत असल्याचे जाणवत असतानाही आपल्या मुलभूत गरजांसाठी कोरोनाचा धोका पत्करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये तयार होतेय की काय, अशी शंका यावी असे दृष्य वर्धा जिल्ह्यातल्या वायगाव येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडीबाजारात पहावयास मिळत आहे.
आठवडी बाजार भरवण्यास मनाई असतानाही, नागरिकांना भाजीची गरज आहे आणि विक्रेत्यांना रकमेची गरज आहे म्हणून ते धोका पत्करून आठवडी बाजारात जाताना दिसत आहेत. गुणकारी हळदीचे उत्पादन घेणाºया या वायगाव तालुक्यात दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. यात जवळपासच्या खेड्यामधील नागरिक मोठ्या संख्येने येतात. गुरुवारी भरलेल्या या बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा मात्र उडाल्याचे दिसते आहे.