शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्था प्रभावी होतेय

By admin | Updated: December 11, 2014 23:13 IST

संगणकाद्वारे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रभाव वाढत असून संरक्षण, रेल्वे, बांधकाम, विमानसेवा अशा विविध क्षेत्रात त्याचा अंतर्भाव होताना दिसत आहे, असे मत प्रमुख उद्घाटक डॉ. निलकंठ पेंडसे यांनी

सेलू : संगणकाद्वारे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रभाव वाढत असून संरक्षण, रेल्वे, बांधकाम, विमानसेवा अशा विविध क्षेत्रात त्याचा अंतर्भाव होताना दिसत आहे, असे मत प्रमुख उद्घाटक डॉ. निलकंठ पेंडसे यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणुकीवर राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी या माध्यमातून प्रकाश टाकला.येथील यशवंत महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने ‘आर्थिक सुधारणेनंतर भारतातील विदेशी प्रत्यक्ष गुतवणूक व त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, कला वाणिज्य महाविद्यालय, कारंजा (घा.) चे प्राचार्य डॉ. संजय धनवटे, डॉ. इंदुरवाडे, प्राचार्य डॉ. किशोर अहेर समन्वयक प्रा. सतिश रघुवंशी उपस्थित होते. डॉ. विलास देशमुख यांनी गुंतवणुकीसोबत सांस्कृतिक क्षेत्रात होणारा बदल भारतीय लोकांच्या भावी पिढीवर जास्त प्रतिकूल प्रभाव वाढवित आहे, असा खेद व्यक्त केला. डॉ. अहेर यांनी ही विदेशी गुंतवणूक आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे, पण यासोबत देशातील उद्योजकांना उत्पादकांना अधिक जास्त दक्षता बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. सतिश रघुवंशी यांनी केले. संचालन प्रा. कृष्णा दीक्षित यांनी केले तर आभार प्रा. अनंत रिढे यांनी मानले. चर्चासत्राच्या द्वितीय भागात विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. हरिदास धुर्वे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. करमसिंग राजपूरे उपस्थित होते. विदेशी गुंतवणुकीचा वाढता प्रभाव व त्याचे होणारे भावी परिणाम या अनुषंगाने विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला. या सत्राचे संचालन प्रा. वसंत राठोड यांनी केले व प्रा. नरेंद्र जाधव यांनी आभार मानले. समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रकाश नाथे होते. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुक टाळणे अशक्य आहे. याउलट स्पर्धेच्या युगात आपली उत्पादकता वाढविण्याला पर्याय नाही, असा सूर उमटला. संचालन डॉ. अर्चना फाळके यांनी केले तर प्रा. राजेंद्र मुंढे यांनी सर्वाचे आभार मानले. चर्चासत्रात सादर शोधनिबंधाची स्मरणिका काढली. यावेळी प्रा. भगत, प्रा. दिक्षीत, प्रा. फाळके, खोब्रागडे, हुमणे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)