खासदारांकडून एफसीआय ग्रेडरची कानउघाडणी
By Admin | Updated: March 4, 2017 00:40 IST2017-03-04T00:40:10+5:302017-03-04T00:40:10+5:30
येथील बाजार समितीत भारतीय खाद्य निगमकडून तुरीची खरेदी सुरू आहे.

खासदारांकडून एफसीआय ग्रेडरची कानउघाडणी
शेतकऱ्यांची कोंडी कायमच : बाजारात बारदाण्याची बोंब
वर्धा : येथील बाजार समितीत भारतीय खाद्य निगमकडून तुरीची खरेदी सुरू आहे. या खरेदीदरम्यान ग्रेडर मनमानी करीत असल्याची माहिती खा. रामदास तडस यांना मिळाली. यावरून त्यांनी शुक्रवारी बाजार समितीत जात स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रेडरने नाकारलेल्या तुरीचीही पाहणी केली.
यावरून त्यांनी खाद्य निगमच्या ग्रेडरची चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी बाजार समितीचे सभापती कार्लेकर यांच्यासह संचालक व सचिव समीर पेंडके यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)