शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या नावे

By admin | Updated: February 5, 2015 23:13 IST

मध्यंतरी शासकीय खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस व्यापाऱ्यांना विकला. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सध्या ३ हजार ६०० ते ३ हजार ८०० रुपयांच्या आसपास दर दिले जात आहे.

हमीभाव घेण्याकरिता व्यापारी दाखवितात नातलगांच्या नावे कापूस भास्कर कलोडे - हिंगणघाटमध्यंतरी शासकीय खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस व्यापाऱ्यांना विकला. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सध्या ३ हजार ६०० ते ३ हजार ८०० रुपयांच्या आसपास दर दिले जात आहे. हे दर जरी शेतकऱ्यांना दिले जात असले तरी व्यापारी त्यांच्या दराला हमीभाव मिळावा, याकरिता शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या नातलगांच्या नावे दाखवित असल्याचा प्रकार हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत समोर येत आहे.कृषी मालाच्या खरेदी विक्रीत शेतकऱ्यांना नगदी चुकार द्यावा लागत असल्याने त्याची अडत कोणी द्यावी या विषयावर राज्यात चिंतन सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आजही सव्वा ते दहा टक्क्यांपर्यंत अडत देत असल्याचे चित्र आहे. राज्यात शासनाच्यावतीने कृषी मालाची खरेदी करणारे पूर्वीचे कापूस फेडरेशन तसेच सध्याच्या नाफेड, सीसीआय सारख्या संस्था नियमांचा भंग करून शेतकऱ्यांना चुकारे १० दिवस ते सहा महिन्यांपर्यंत देत नाही, यामुळे त्यांची अडचण होत आहे. शेतमालाची अडत व्यापाऱ्यांकडून घेण्याच्या शासन निर्णयामुळे व्यथित झालेल्या कृ.उ.बा.समितीच्या व्यापाऱ्यांनी खरेदी बंदीचा निर्णय घेतला. स्थानिक बाजार समितीने संचालक मंडळाची तातडीची बैठक घेवून धान्य मालाची दीड टक्का व कापसाची सव्वा टक्का अडत अर्ध्यावर आणून शेतकऱ्यांऐवजी ती व्यापाऱ्यांकडून घेण्याबाबत सहमती मिळविली होती. राज्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू होताच अवघ्या काही तासातच राज्य शासनाने आपल्या निर्णयाला स्थगिती दिल्याने येथील अडत पूर्ववत झाली. कापूस कमिशन आॅफ इंडियाने कापसाला प्रति क्विंटल ४ हजार ५० रुपये भाव देत शेतकऱ्यांना आधार दिला आहे. या सीसीआयकडून कापसाचे चुकारे १० ते १५ दिवसानंतर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कापूस अडते, व्यापारी आपल्या कुटुंबीयांचे नावे लागून हमी भावापेक्षा कमी शेतकऱ्यांना देत आहे. अशास्थितीत पांढऱ्या सोन्याच्या विक्रीतून भांडवलदारांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात पांढरा होत आहे.हिंगणघाट बाजार समितीत २७ जानेवारी २०१५ पर्यंत ८ लाख ८४ हजार ८८१ क्ंिवटल कापसाची खरेदी झाली. यापैकी सीसीआयची कापूस खरेदी ३ लाख ५८ हजार ४८७ क्विंटल झाली आहे. सीसीआयच्या कापूस खरेदीत १०० किलो कापसातून रूईचे प्रमाण ३५ किलो ऐवजी ३२ किलो गृहीत धरले जात असल्याने सीसीआयच्या तोट्यात वाढ होणार आहे. जागतिक मंदीच्या काळात शासनाने सीसीआयद्वारा हमी भावात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांनी मदतीचा हात दिला असला तरी यंत्रनेतील चौकशी केल्यास यातील घोळ समोर येण्याची शक्यता आहे.