शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे शेतकरी वैतागले

By admin | Updated: August 18, 2014 23:39 IST

पावसाच्या दडीने शेतातील पीक मरनासन्न अवस्थेत आले आहे. अशात ओलिताची सोय असणाऱ्यांनी ओलीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही इमरजन्सीच्या नावाखाली होत असलेल्या भारनियमनाचा

ग्रामसभेत ठराव : वीज वितरणवर हल्लाबोल पवनार : पावसाच्या दडीने शेतातील पीक मरनासन्न अवस्थेत आले आहे. अशात ओलिताची सोय असणाऱ्यांनी ओलीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही इमरजन्सीच्या नावाखाली होत असलेल्या भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यामुळे वैतागलेल्या गावाकऱ्यांनी मंगळवारी येथील वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा ठराव स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत घेतला. वरूणराजाची अवकृपा झाल्यामुळे पीक वाचविण्यासाठी ज्यांच्याकडे पाणी देण्याचे स्त्रोत आहेत त्यांची धडपड सुरू आहे; परंतु भारनियमनामुळे त्यांच्या या प्रयत्नावर पाणी फेरल्या जात आहे. पवनार भागात फक्त आठ तास शेतीला वीज दिल्या जाते. यात तीन दिवस सकाळी १० ते ६ व चार दिवस रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत भारनियमन होते. त्यातही अनियमितता आहेच. यातही इमरजन्सी भरनियमन असा शब्दप्रयोग वापरला जातो. शेतीशास्त्रानुसार शेतीची कामे ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केली जातात; परंतु रात्री १२ वाजता जर कृषिपंपाना वीज पुरवठा केला जात असेल तर शेतकऱ्याने काय शेतातच वीजेची प्रतीक्षा करीत बसावे काय असा सवाल करण्यात आला आहे. थोडा पाऊस झाल्यामुळे बंधाऱ्यावर गवत वाढले आहे. त्यातून शेतकऱ्याला वाट काढीत शेतात जाऊन पाणी द्याव लागत आहे. शिवाय रानडुक्कर, रोही यासह सरपटणाऱ्या वन्यप्राण्यांची सुद्धा भीती आहे. यामुळे जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कंपनीच्या स्थानिक कार्यालयात निवेदने देऊनही त्याचा उपयोग झाला नाही. यामुळे गावातील कृषी पंप धारकांनी १५ आॅगस्टला झालेल्या आमसभेत ठराव घेवून १९ आॅगस्ट मंगळवारला वीज वितरण कार्यालय पवनार येथे धरणे देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत १२ तास वीज देण्याची मागणी करण्यात येणार आहे.(वार्ताहर)