शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:25+5:30

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे.

Farmers wait for Panchanama | शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षाच

शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षाच

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : सोयाबीनने दिला दगा, शेतकरी चिंताग्रस्त, कपाशीला अज्ञात रोगाची लागण

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : २७ आॅक्टोबरला झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपले. सोयाबीन, पºहाटी, झेंडू पिकासह बागायदार शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप तालुक्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकरी धास्तावलेले आहेत.
परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे.
सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे. उत्पादनात कधी नव्हे इतकी घट झाली आहे. त्यातच शेतमालाला दिल्या जाणाऱ्या अल्पभावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन कवडीमोल भावात विकले जात आहे. पांढºया सोन्यावर अज्ञात रोगाचे सावट असून पऱ्हाटी कापूस येण्यापूर्वीच पिवळी पडू लागली आहे.
कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. या भागात अद्याप शेतकऱ्यांनी शीतदहीसुद्धा केले नाही. तालुक्यातील महत्त्वाचे असलेले संत्रा पीकसुद्धा धोक्यात आले आहे. ढगाळ हवामानामुळे संत्रा पिकाला गळती लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात शेतकरी संत्रा बागांची तयारी करतात. शेतकऱ्यांची बेगणी बांधणे, आळे करणे ही कामे सुरू असतात. परंतु जमिनीमध्ये एवढा ओलावा आहे की, शेतामध्ये वखरण, कल्टीव्हेटर काहीही करता येत नाही. त्यामुळे वाढलेले तण काढणे सुध्दा शक्य नाही. परिणामी, शेतात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रा फळाला गळती लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.
शेतामध्ये असलेल्या ओलाव्यामुळे रब्बी हंगामपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली नाही. ाालुक्यात सध्या वाघाची दहशत असून दररोज कुठे ना कुठे घटना घडत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जायलासुद्धा तयार नाहीत. अशा अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी त्रस्त असताना शासन स्तरावरून कोणतीही मदत मिळालेली नाही. शासकीय यंत्रणेने अद्याप नुकसानाची साधी चौकशीसुद्धा केलेली नाही.


तीन वर्षांच्या नापिकीनंतर यंदाही अतिवृष्टीने नुकसान
तीन-चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाचे विलंबाने आगमन झाले. त्यानंतर मात्र, दीड महिना पावसात सातत्य राहिल्याने पिके बहरली. अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून पिके पाण्याखाली येत पिवळी पडली. अनेक रोगांनीही आक्रमण केल्याने यावेळीही सोयाबीन, कपाशीचे उत्पादनात घट येईल, अशी सद्यस्थिती आहे.

Web Title: Farmers wait for Panchanama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.