शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाला वाहून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:00 AM

शेतकऱ्यांची परिस्थिती याच कारणाने हलाखीची ठरली. आज शासनाच्या अनेक योजनांतून संधी असल्याने शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. पुन्हा पशुपालनाकडे वळून आर्थिक परिस्थितीला गती द्यावी, असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. स्थानिक मिरणनाथ मंदिर प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय पशु पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देरामदास तडस : देवळीत जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : आधी प्रत्येकजण शेती व्यवसायाला पूरक धंदा म्हणून चाऱ्याच्या व्यवस्थेसह गोधन पाळत होते. परंतु, कालांतराने याकडे दुर्लक्ष झाल्याने हा व्यवसाय मोडीत निघाला. शेतकऱ्यांची परिस्थिती याच कारणाने हलाखीची ठरली. आज शासनाच्या अनेक योजनांतून संधी असल्याने शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. पुन्हा पशुपालनाकडे वळून आर्थिक परिस्थितीला गती द्यावी, असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. स्थानिक मिरणनाथ मंदिर प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय पशु पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे होत्या. जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, जि.प. पशुसंवर्धन व कृषी सभापती माधव चंदनखेडे, माजी जि.प. सभापती मुकेश भिसे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, पं.स. सभापती कुसुम चौधरी, उपसभापती युवराज खडतकर, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांची उपस्थिती होती.युवकांनी नोकरीच्या शोधात वणवण भटकण्यापेक्षा दुग्ध व्यवसायाकडे वळावे. गवळाऊ व देशी गाई पाळून दुधापासून निर्मित उत्पादन तयार करावे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष गाखरे यांनी केले. आसंमत स्रेहालयाच्या चमूने नाटिकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या व्यथांचे सादरीकरण केले.प्रदर्शनात विविध जातीच्या २३० जनावरांचा सहभाग होता. प्रत्येक जनावरांमागे केवळ ३०० रुपयांचा भत्ता असल्याने दूरवरून येणाºया पशुपालकांचा प्रदर्शनात अत्यल्प प्रतिसाद होता.पुरस्कारांच्या रक्कमही अतिशय तोकड्या असल्याने प्रदर्शनात आलेल्या पशुपालकांत नाराजी दिसून आली. संकरित कालवड, संकरित गाय, देशी गाय, देशी वळू, म्हैस व शेळी या सह गटात प्रदर्शन भरविण्यात आले. शेळीगटात संगमनेरी, उस्मानाबादी, जमुनापारी, बिटल पंजाब व संकरित जातीच्या बोकडांचा समावेश होता. एक लाखावर किंमत असलेले सिंदी, वडद व देवळी येथील बोकड लक्षवेधी ठरले. बक्षिसात समावेश नसलेल्या पक्षीगटात कोंबड्यांचा समावेश होता.जि.प. उपाध्यक्ष यांचे यजमान जयंत येरावार यांनी प्रदर्शनातील २ हजार ५५० रुपयांचा कोंबडा विकत घेऊन बोहणी केली. प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे तर संचालन पट्टेवार यांनी केले. आभार डॉ. संजय खोपडे यांनी मानले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य नीता गजाम, सोनाली कलोडे, राजश्री राठी, मयुरी समराम, पं.स. सदस्य विद्या भुजाडे, दिलीप अग्रवाल, दुर्गा मडावी, सहायक आयुक्त डॉ. बागल, डॉ. जे.एन. चहांदे, डॉ. क्रांती खारकर, डॉ. अलोणे, डॉ. पंचभाई, डॉ. वानखेडे, डॉ. अश्विनी मेश्राम, सहा. गटविकास अधिकारी गायगोले, नगरसेवक नंदू वैद्य, सारिका लाकडे, संध्या कारोटकर, दशरथ भुजाडे, डॉ. अंदूरकर, डॉ. मडावी यांच्यासह पशुपालकांची उपस्थिती होती.विविध गटातील विजेत्यांना पुरस्कारसंकरित कालवड गटात प्रथम अनिल सोनोने नागपूर, द्वितीय नरेश धंदरे देवळी व तृतीय पुरस्कार नीलेश मोटघरे तळेगाव दशासर, संकरित गाय गटात प्रथम नानाजी उपासे देवळी, द्वितीय अंकुश ठाकरे देवळी, तृतीय राहुल ठाकरे देवळी, देशी गाय गटात प्रथम भोजराज अर्बट खरांगणा, निलज खटोले मोर्शी, तृतीय अनिल कारोटकर, देशी वळू गटात मंगेश कालोकर तळेगाव रघुजी, द्वितीय रूपराव अरगडे, दहेगाव गोंडी, तृतीय रामभाऊ कुंभारे तळेगाव टालाटुले, म्हैस गटात प्रथम धीरेंद्र दरणे वाबगाव, द्वितीय महादेव पाटील वायगाव, तृतीय देवराव दांडवे नागझरी, शेळी गटात प्रथम प्रेम शिंदे वायगाव, सुरेश मेश्राम वडद व तृतीय पुरस्कार गोकुल ठाकरे सिंदी (रेल्वे) यांना देण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरी