शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे शेतकऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:01 IST

गतवर्षी बोंडअळीने परिसरातील कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांचे बारकाईने निरीक्षण असून विशेष काळजी घेतल्या जात आहे.

ठळक मुद्देबोंडअळीवर ठेवणार शेतकरी गट लक्ष : नागपुरातील तज्ज्ञ सांगणार उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कपोहणा : गतवर्षी बोंडअळीने परिसरातील कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांचे बारकाईने निरीक्षण असून विशेष काळजी घेतल्या जात आहे.कापसावर यावर्षी बोंडअळीचे प्रमाण केवळ ५ ते १० टक्केच असून बुरशीजन्य रोगांमुळे बोंड सडण्याचे प्रमाण मात्र दिसून येतात. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविण्यात याव्यात व बुरशीसदृश्य रोगांमुळे बोंड सडण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर पृथ्थकरण करण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे अमृतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकºयांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने अमृतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या परिसरातील शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात येवून कपाशी पिकावर येणाऱ्या रोगांचे निरीक्षण करून त्याचे संशोधन व उपाययोजना करण्याकरिता नागपूर येथील केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेत रोगग्रस्त कपाशी झाडे नेऊन रोगनिराकरण उपाययोजनांचे मार्गदर्शन या शेतकरी मार्गदर्शन गटामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना दिल्या जात आहे.प्रत्येक गावासाठी कृषी सहाय्यकांची पदे नेमलेली असताना सुध्दा ते मार्गदर्शन करण्यास असमर्थ ठरले आहे. धास्तावलेल्या शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून या शेतकरी मार्गदर्शक गटाने पुढाकार घेतला आहे. रोगग्रस्त कपाशी झाडे नागपूर येथील कापूस संशोधन केंद्राच्या वैज्ञानिकांकडून तपासून रोगनिदान केला जात आहे.या गटांमध्ये अमृतराव देशमुख यांच्यासह सतीश रेड्डी, प्रशांत बोबडे, युवराज देशमुख, सतीश डोबले, आशिष हांडे, राजेश रेवतकर, सुनील ढोले, गोपाल पालीवाल, अशोक पालीवाल, उमेश ठाकरे यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकºयांचा समावेश आहे.पोहणा परिसरातील कपाशी पिकांकडे आमचे बारकाईने लक्ष असून आलेल्या रोगांचे कापूस संशोधन संस्थेमार्फत निदान करून त्यावरील उपाययोजना शेतकºयांना सांगण्यात येईल.- प्रशांत बोबडे, प्रगतशील शेतकरी पोहणा.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी