शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत शेती खरडून गेल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल

By admin | Updated: August 22, 2015 02:18 IST

मोरांगणा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरडून निघाली.

खरांगणा (मो.) : मोरांगणा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरडून निघाली. परिणामी पिके नष्ट झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे.तलाठी साजा क्र. ३० मधील शेतकरी सतीशलाल बालकराम बत्रा सर्व्हे नं. २४८/४ आराजी १.६२ हेक्टर, जितेंद्र सतीशलाल बत्रा सर्व्हे क्र. २४८/१ आराजी १.८८ हेक्टर आर व संतोषराणी बत्राा सर्व्हे क्र. २४८/४ आराजी १.७४ हे.आर. अशी या कुटुंबाची शेती आहे. यात कपाशी, तूर, सोयाबीन व ज्वारींची लागवड या कुटुंबीयांनी केली होती. पिके डौलदारपणे उभी असताना दोनवेळा झालेल्या अतिवृष्टीत सदर पिके पूर्णत: वाहून गेली. शेतात ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक कंबरडेच मोडले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्तरेकडील वरच्या भागातून वर्धा-आर्वी राजमार्ग गेला आहे. या मार्गावर शेतकऱ्याच्या शेताजवळच रपटा बांधण्यात आला. त्यामुळे डोंगरकपारीतून येणारे पाण्याचे लोट रपट्यातून मोठ्या प्रमाणात सरळ शेतात शिरले. शेती पिकांसकट खरडून निघाली. यात सर्व कुटुंबाची ५.२८ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांनी तहसीलदार जिल्हाधिकारी, तलाठी, यांना लेखी तक्रार दिली, पण आठ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सदर कुटुंब हवालदिल झाले आहे.(वार्ताहर)