शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आर्थिक पेचात

By admin | Updated: May 31, 2014 23:42 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरिपाची तयारी : वाढत असलेल्या बियाण्यांच्या किमतीमुळेघोराड :  खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.विविध कंपन्यांनी १८ किलो, २५ किलो, २७ किलो, २0 किलो व ३0 किलोची सोयाबीन बियाण्याची बॅग कृषी केंद्रामध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या बियाण्याची किंमत कंपनीने ठरविल्यानुसार ८६ ते १0४ रुपये किलो चा भावाने शेतकर्‍यांना घ्यावी लागत आहे. शेतकर्‍यांनी ज्यावेळी सोयाबीन बाजारपेठेत सुरुवातीस विक्रीस नेले त्यावेळी ३२00 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. जेव्हा बाजारपेठेत सोयाबीन अत्यल्प प्रमाणात विक्रीस आली तेव्हा ४७00 रुपये भावाने व्यापार्‍यांनी खरेदी केली पण जेव्हा बियाणे खरेदीची वेळ आली तेव्हा आता  असलेले भाव पाहून शेतकरी अवाक होत आहे. वाढलेले भाव पाहता सोयाबीनचे उत्पादन न घेता कपाशीचे पीक घ्यावे का असा विचार शेतकरी करीत असताना दिसत आहे. पण या पिकाला येणारा  खर्च कसा करावा या विवंचनेत शेतकरी असल्याने बियाणे महाग असले तरी ते घ्यावेच लागणार असाही विचार त्याच्या मनात येत आहे. पण तुर्तास तरी शेतकरी आर्थिक बजेट आखत आहे. दरवर्षी सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांजवळ राहत होते. यावर्षी सोयाबीनच्या मळणीच्या वेळी सातत्याने पाऊस आल्याने सोयाबीन ओलीचिंब झाले. त्यामुळे शेतकर्‍याजवळ घरगुती बियाणे नाही. शेतकर्‍यांची सोयाबीन पावसात सापडली मग कंपन्यांनी पिकविलेली सोयाबीन पावसात भिजली नसेल का असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे. विविध कंपण्याच्या बियाण्याच्या उगवण शक्तीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संभ्रम कायम आहे. पारंपरिक शेती उद्योग या महागाईमुळे अडचणीचा ठरू पाहत आहे.(वार्ताहर)