शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘जय अंबे’ च्या गजरात दूर्गेची स्थापना

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

जय अंबे... जय दूर्गेचा गजर, ढोल ताशांचा निनाद व गुलालाची उधळण करीत नवदूर्गेची स्थापना करण्यात आली. शहरात सकाळपासूनच दूर्गेची स्थापना करण्यात सर्वच मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त होते.

वर्धा : जय अंबे... जय दूर्गेचा गजर, ढोल ताशांचा निनाद व गुलालाची उधळण करीत नवदूर्गेची स्थापना करण्यात आली. शहरात सकाळपासूनच दूर्गेची स्थापना करण्यात सर्वच मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त होते. रात्री उशिरापर्यंत दूर्गेची स्थापना सुरू होती. नवरात्र सुरू होण्यापूर्वी महिनाभरापासून दूर्गेच्या स्वागताकरिता विविध मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले होते. वर्गणी गोळा करण्यापासून तर रोषणाईच्या कामात सारे व्यस्त होते. यातही इतर मंडळाच्या तुलनेत आपल्या मंडळाची रोषणाई कशी चांगली दिसेल, आपण यंदा नवीन काय करावे याची योजना आखून कामे आटोपून गुरुवारी सर्वत्र दूर्गेची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक स्थळी होणाऱ्या दूर्गेच्या स्थापनेसह घरोघरी घटही मांडण्यात आले. यात शहरातील नागरिक सकाळपासून व्यस्त होते. शहरात बुधवारपर्यंत परवानगीकरिता ७० मंडळांनी संपर्क साधल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर गत वर्षी जिल्ह्यात एकूण ५६० सार्वजनिक दूर्गा मंडळांनी दूर्गेची स्थापना केल्याची नोंद आहे. नवरात्रोत्सवादरम्यान वर्धेत होत असलेली रोषणाई पाहण्याकरिता केवळ शहरातीलच नाही तर बाहेरगावातील नागरिकही येतात. त्यांच्या स्वागतकारिता वर्धेतील मंडळे तयार झाली आहेत.या नऊ दिवसात शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाकरिता मोठ मोठे कलाकारही वर्धेत येत असतात. त्यांच्या संगिताच्या कार्यक्रमाची मेजवानी वर्धेकरांकरिता आकर्षण ठरणारी आहे. (प्रतिनिधी)