शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आदिशक्तीची स्थापना

By admin | Updated: October 14, 2015 02:06 IST

प्रेम से बोलो जय माता दी... बोलो अंबे मात की जय... जय अंबे.. जय दुर्गे.. अशा गगनभेदी जयघोषासह ढोल-ताशांच्या निनादात...

ढोल-ताशांचा निनाद.. जय अंबे.. जय दुर्गेच्या गजरात वर्धा : प्रेम से बोलो जय माता दी... बोलो अंबे मात की जय... जय अंबे.. जय दुर्गे.. अशा गगनभेदी जयघोषासह ढोल-ताशांच्या निनादात जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र आदिशक्तीची स्थापना करण्यात आली. सर्वाच्याच ओठांवर केवळ जगदंबेचा गजर होता. सकाळपासून रात्रीपर्यंत दुर्गेची स्थापना सुरूच होती. वर्धा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण होते. आजपासून सतत नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी वर्धानगरी रोषणाईने उजळून निघाली आहे. अश्विन महिन्यात येत असलेल्या या नवरात्र उत्सवाला शरदीय नवरात्र असेही म्हणतात. या उत्सवात जिल्ह्यात बहुसंख्य घरांमध्ये घटस्थापना केली जाते. नऊ दिवसांसाठी अखंड दीप प्रज्वलित केला जातो. यासह हजारावर सार्वजनिक मंडळाद्वारे दुर्गामूर्तीची स्थापना केली जाते. यामध्ये वर्धा शहरातील दुर्गोत्सव तर डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. मंडळाची नाविण्यपूर्ण सजावट, आकर्षक रोषणाई यासह नऊही दिवस होणारे अन्नदान आणि धार्मिक कार्यक्रम भाविकांसाठी आकर्षण ठरणारी असतात. या नऊ दिवसांत प्रत्येक मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असते.मंगळवारी सकाळपासूनच बँडच्या गजरात दुर्गामूर्तीची भव्य मिरवणूक निघाली. यावेळी पोलिसांकडून बंदोवस्तही ठेवण्यात आला होता. त्याचप्रकारे मंडळांनीही अतिशय संयमाने मिरवणूक काढल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. देवी आसनस्थ असलेला मंच हा नाविण्यपूर्ण आणि भव्य असावा, असा प्रयत्न मंडळांचा असल्याचे दिसून आले. त्यात अनेक मंडळांनी पर्यावरणाचा विचार करून कापड आणि इकोफ्रेंडली साहित्याचा वापर करून सजावट केल्याचे दिसले. मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात देवीच्या मूर्तीची स्थापना मंंडळांद्वारे सुरूच असल्याचे दिसून आले. मंडळांच्या देवीसह स्थापित व जागृत देवी मंदिरांमध्येही आदिशक्तीचा जागर सुरू झाला आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)