शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भावाला ओवाळणीसाठी जाणाऱ्या बहिणीचा अंत; कारला झाला अपघात  

By आनंद इंगोले | Updated: November 16, 2023 20:12 IST

दिवाळी आटोपल्यानंतर आता भाऊबीजेनिमित्त भावाला ओवाळण्यासाठी जात असलेल्या बहिणीच्या कारचा अपघात होऊन बहिणीची करुण अंत झाला.

देवळी (वर्धा) : दिवाळी आटोपल्यानंतर आता भाऊबीजेनिमित्त भावाला ओवाळण्यासाठी जात असलेल्या बहिणीच्या कारचा अपघात होऊन बहिणीची करुण अंत झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दिंदोडाजवळील टाकळी (किटे) शिवारात घडली. या अपघात पती आणि दोन चिमुकले थोडक्यात बचावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मी प्रशांत माकोडे रा. चंद्रपूर असे मृत बहिणीचे नाव आहे. त्याच पती प्रशांत वसंत माकोडे (४०), मुलगा पार्थ (९) व अथर्व (७) यांच्यासोबतच एम.एच.३४ व्ही.आर.५७४० क्रमाकाच्या कारने चंद्रपूर येथून सेलुला भावाकडे जात होत्या. सेलुपासून १२ किलोमीटर अंतरावर टाकळी (किटे) जवळील वळण रस्त्यावर कार अनियंत्रित होऊन पलटी झाले. यात रश्मीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर कारचालक प्रशांत माकोडे यांच्यासह पार्थ आणि अथर्व यांना किरकोळ मारला लागला. या घटनेने सेलू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सेवाग्राम रुग्णालयात शवविच्छेदन करुन तिचे पार्थिव सर्वप्रथम सेलूला माहेरी नेण्यात आले. याठिकाणी माहेरच्या कुटुंबीयांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर पार्थिव चंद्रपुरला सासरी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली. ...अन् माहेरी मुलीचे पार्थिवच आले!दरवर्षीप्रमाणे भावाला ओवाळण्याकरिता रश्मी आपल्या परिवारासोबत सेलूला माहेरी येत होती. भावाला ओवाळण्याकरिता बहिण आणि जावाई येत असल्याने सेलू येथील माहेरची मंडळीही आनंदात होती. पाहुणे कधी पोहोचेल म्हणून माहेरची मंडळी सातत्याने रश्मीसोबत संपर्कात होते. सेलूपासून अवघ्या काही अंतरावरच असल्याने रश्मी माहेरच्यांना फोन करुन बोलत होती. आम्ही अर्ध्या तासांत पोहोचतो, अशी सांगत होती. त्यामुळे माहेरीही तयारी सुरु झाली होती. पण, काळाने झडप घालून रश्मीला हिरावून घेतल्याने माहेरी मुलगी नाही तर तिचे पार्थिवच पोहोचले.

टॅग्स :wardha-acवर्धाAccidentअपघातDeathमृत्यू