कारंजा महामार्गावरील सर्व्हीस रोडवरील अतिक्रमण हटणार

By Admin | Updated: June 22, 2017 00:46 IST2017-06-22T00:46:15+5:302017-06-22T00:46:15+5:30

कारंजा बसस्थानक परिसरात महामार्ग क्र. ६ वरील दोन्ही सर्व्हीस मार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे.

The encroachment on the Sarovis Road on the Karanja Highway will be removed | कारंजा महामार्गावरील सर्व्हीस रोडवरील अतिक्रमण हटणार

कारंजा महामार्गावरील सर्व्हीस रोडवरील अतिक्रमण हटणार

द्वि-दिवसीय मोहीम : अखेर सापडला मुहूर्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : कारंजा बसस्थानक परिसरात महामार्ग क्र. ६ वरील दोन्ही सर्व्हीस मार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता बळावत असून बहुदा वाहतुकीची कोंडीही होते. सदर जीवघेणे ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी ओरिएंटल पाथवे कंपनीला शेवटी मुहूर्त सापडला असून विशेष मोहीम हाती घेत २३ व २४ जूनला अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
विशेष मोहीम हाती घेत २३ व २४ जूनला अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे संकेत आहे. या सर्व्हीस रोडची देखभाल आणि सुरक्षितता यांची जाबबदार असणाऱ्या ओरिएंटल पाथवे कंपनीने उशिरा का? होईना, अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त ठरविला आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. दोन अधिकारी व १२ पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण ओरिएंटल पाथवे कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळेच वाढल्याची परिसरात ओरड आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे सामान्यांसह वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक छोटे-मोठे अपघात सुद्धा या भागात झालेले आहेत. जनसामान्यांची मागणी लक्षात घेऊन कारंजा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी २० दिवसापूर्वी अतिक्रमण काढण्याच्या लेखी सूचना संबंधीतांना दिल्या होत्या; पण सुरूवातीला ओरिएंटल पाथवे कपंनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला, हे उल्लेखनिय.

Web Title: The encroachment on the Sarovis Road on the Karanja Highway will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.