शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 5:00 AM

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जण जुगार खेळताना आढळले. त्यांच्याजवळून रोख ३१ हजार ११० रुपयांसह नऊ मोबाईल, पाच दुचाकी, दोन चारचाकी वाहने असा एकूण पाच लाख चार हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूच्या प्रांगणातच चक्क जुगार भरला. या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जणांना ताब्यात घेऊन पाच लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रकाश वामनराव कुंदापवार (५३), देवानंद विठ्ठलराव जामनकर (४८), गणेश भीमराव गोसावी (५५), प्रकाश भैयालाल व्यास (५८), गुणवंत तुकाराम ढाकणे (४७), अनिल तुकाराम शिरभाते (४५), संदीप रामराव श्रीरामे (४५), चरण तारासिंग राठोड (५३) आणि येरावत चव्हाण अशी अटकेतील आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहे. यापैकी काही क्लर्क तर काही जण वाहनचालक आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जण जुगार खेळताना आढळले. त्यांच्याजवळून रोख ३१ हजार ११० रुपयांसह नऊ मोबाईल, पाच दुचाकी, दोन चारचाकी वाहने असा एकूण पाच लाख चार हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी धाड टाकताच आरोपी येरावत चव्हाण (५५) हा पसार होण्यात यशस्वी झाला. उर्वरित आठ जणांना पोलिसांनी अटक करून रात्रीच जामिनावर सुटका केली. या सर्वांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सांगितले. ही कारवाई पीएसआय दर्शन दिकोंडवार, सचिन सरकटे, सुरेश मेश्राम, प्रदीप कुरडकर, दिनेश निंबर्ते, बबलू पठाण, सागर चिरडे, धनंजय पोटपल्लीवार, प्रशांत राठोड यांनी पार पाडली. 

कारवाईचे निर्देशजिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी या गंभीर घटनेची नोंद घेत सीईओंना संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले. या घटनेमुळे जिल्हा परिषदेची नाचक्की झाल्याची त्यांनी स्पष्ट केले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

अनेक महिन्यांपासून सुरू होता मैदानात अड्डाजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालय परिसरात शुकशुकाट असतो. या परिसरात भरपूर मोकळी जागाही आहे. विशेष म्हणजे याच परिसरालगत जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतीक्षालय आहे. मात्र हा परिसर नेहमीच सुनसान असल्याने काही क्लर्क, वाहनचालक व इतर कर्मचारी तेथे जुगार अड्डा भरवित होते. अनेकदा येथेच्छ मद्यप्राशनही केले जात होते. या परिसरात जुगार भरत असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. अखेर अवधूतवाडी पोलिसांनी या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. आता सीईओ त्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliceपोलिस